गडचिरोली : श्रीसंत शिरोमणी जगनाडे महाराज यांचा जयंती उत्सव येत्या २७ डिसेंबर रोजी शहरातील आरमोरी मार्गावरील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या तेली समाज संघटनेच्या नियोजन बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्याने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, विदर्भ तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के, अॅड. रामदास कुनघाडकर, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, रमेश भुरसे, विठ्ठल कोठारे, गोपीनाथ चांदेवार, व्यंकटेश सोमनकर, वंदना सोमनकर, पुष्पा करकाडे, शालिनी कामडी, मुक्तेश्वर काटवे, लीलाधर भरडकर, बालाजी भांडेकर, विजय भांडेकर, राजू भरडकर, संजय खोब्रागडे, विलास निंबोरकर, संतोष चिलबुले, शरद निंबोरकर, सुधाकर दुधबावरे, बालाजी भुरले, विष्णू कामडी, अनिल कोठारे, चंद्रकांत कोठारे, चंद्रकिशोर किरमे, रवींद्र कामडी, बंडू चिलबुले, रमेश कामडी, नीलेश सातपुते व तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade