तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग1)
विषमता, अहिष्णुता, भेदा भेद मंगल म्हणजे पारतंत्र्य , मुठभरानी ढिगभरांवर केलेले राज्य म्हणजे गुलामगिरी, खोटा देव निर्माण करणे, खोटी शास्त्रे निर्माण करणे व देवाचा धाक दाखवुन लुटारू वृत्ती म्हणजे देवाचा हुकूम सांगुन राबवणे म्हणजे ब्राह्मण शाही. या असल्या विकृतपणला खतपाणी न घालने. या असल्या अमानवी पणला आपण होऊन अप्रतिष्ठा देणे म्हणजे श्री. तुकारामांचे अभंग भंग न पावणार्या विचाराला जीवंत तर ठेवलेच उलट भर घालुन उद्या साठी शाबुत ठेवणे म्हणजे श्री. संत संताजी. श्री संत संताजीचा नुसता जय जय कार करणे म्हणजे फक्त श्रद्धा या श्रद्धे सह त्यांना समजुन घेणे म्हणजे संताजी, विचाराची निष्ठा ही निष्ठा. सांगण्याची आज वेळ आली म्हणुन हे पुन्हा पुन्हा मांडणे व समजुन घेऊन अवघा तेली समाज नव्हे तर मानव जात असल्या ब्राह्मणीपणाच्या विरोधात उभे करणे म्हणजे संताजीचे अपुर्ण राहिलेले कार्य पुर्ण करणे.