मुंबई : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा (मुंबई विभाग) आणि आम्ही तेली प्रतिष्ठान (भांडूप) यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजासाठी एक अनोखा आणि समावेशक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भांडूप (पश्चिम) येथील सह्याद्री विद्या मंदिर (शहीद जयवंत हनुमंत पाटील मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, जंगल मंगल रोड, मुंबई - ४०००७८) येथे महाराष्ट्र स्तरीय भव्य निःशुल्क वधू-वर पालक परिचय मेळावा पार पडणार आहे.

हा मेळावा विशेष म्हणजे समाजातील पहिल्यांदा लग्न करणाऱ्या वधू-वरांसह घटस्फोटित, विधवा-विधूर आणि अपंग बंधू-भगिनींसाठीही खुला आहे. समाजातील सर्व वर्गांना समान संधी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. मेळाव्यात वधू-वरांनी स्वतः उपस्थित राहून स्टेजवर येणे बंधनकारक आहे, जेणेकरून परिचय अधिक प्रभावी होईल. मेळावा वेळेवर सुरू होणार असल्याने सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणीची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२६ आहे. या तारखेनंतर आलेली माहिती वधू-वर पुस्तिकेत समाविष्ट होणार नाही आणि पुरवणी पुस्तिका काढली जाणार नाही. इच्छुकांनी फॉर्म भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री. विलास त्रिंबककर, विलास आर्ट, १५/सी, लक्ष्मी कृपा, एम.जी. रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०००८६ किंवा श्री. प्रविण दहितुले, प्रविण आर्ट, राजाराम यादव चाळ, उत्कर्ष नगर, टेंभीपाडा रोड, भांडूप (प.), मुंबई - ४०००७८.
कार्यक्रमाच्या यशासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा (मुंबई विभाग) आणि आम्ही तेली प्रतिष्ठान (भांडूप) च्या कार्यकारिणीने पूर्ण तयारी केली आहे. महासभेचे अध्यक्ष श्री. विलास त्रिंबककर, महिला अध्यक्ष सौ. रोहीणीताई महाडीक, कार्याध्यक्ष श्री. संतोष रहाटे, सचिव श्री. जयवंत काळे, सहसचिव श्री. प्रफुल खानविलकर, युवा अध्यक्ष श्री. प्रविण रहाटे, खजिनदार श्री. नितीन लांजेकर आदींसह अनेक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. आम्ही तेली प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रविण दहितुले, उपाध्यक्ष श्री. अमोल साळुंखे, सचिव श्री. प्रविण रहाटे यांच्यासह कार्यकर्तेही उत्साहाने काम करत आहेत.
संपर्कासाठी : श्री. चंद्रशेखर रहाटे (९५९४१९०५९९), श्री. जयवंत काळे (९१६७९६३३८८), श्री. प्रफुल खानविलकर (७७१८९०११९६), श्री. गणेश कोचरेकर (९९८७५३३८३०), सौ. कांचन पिंगळे (९८६७७९६१५०) आदी.
विभागवार नोंदणी आणि संपर्कासाठी अनेक कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. यात श्री. किसन कर्डिले (लालबाग), श्री. चंद्रकांत कामतेकर (जोगेश्वरी), श्री. संतोष चव्हाण (भायखळा), श्री. कमलाकर शेलार (ठाणे), श्री. भगवान बोरसे (पालघर), श्री. अतुल खंडाळकर (पनवेल), श्री. अनिल घाटकर (पुणे) यांच्यासह राज्यभरातील अनेक कार्यकर्ते सहभागी आहेत.
हा मेळावा तेली समाजाला एकत्र आणण्याचा आणि विवाह संबंध मजबूत करण्याचा एक उत्तम उपक्रम ठरेल. सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन याला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade