लातूरच्या श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानात महाशिवरात्री यात्रा उत्साहात वीरशैव तेली समाजावतीने गंगाजल अभिषेक व श्रींची मानाच्‍या काठीचे पूजन

     लातूर, दि. १६ मार्च २०२६ : लातूरच्या जागृत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानात महाशिवरात्री यात्रेचा भव्य प्रारंभ झाला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वीरशैव तेली समाज लातूर यांच्या वतीने गंगाजल अभिषेक आणि मानाची काठी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Latur Teli Samaj Gangajal Abhishek & Manachi Kathi Puja at Siddheshwar Ratneshwar Temple Mahashivratri Yatra Latur

     श्री सिद्धेश्वर हे जागृत देवस्थान असुन अभिषेकाचा मान वीरशैव तेली समाजाला मिळतो. श्रींची मानाची काठी वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ सपत्नी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले ही मिरवणूक लोखंडे बिल्डिंग सुभाष चौकीतून निघून लातूर शहरातील सुभाष चौक खडका हनुमान तेली गल्ली पटेल चौक मार्गे सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली सिद्धेश्वर मंदिरात श्री बाबासाहेब कोरे यांनी मानेच्या काठीची पूजन करून स्वागत केले

Veerashaiva Teli Samaj Celebrates Mahashivratri Yatra in Latur Gangajal Abhishek Sacred Staff Puja at Siddheshwar Temple

     या प्रथेनुसार समाजातील महिला भगिनींनी गंगेच्या पाण्याचे कळश डोक्यावर घेऊन, वाजंत्री आणि भजन मंडळासह भव्य मिरवणुकीने मंदिरात प्रवेश केला. मंदिरात पोहोचल्यानंतर समाजातील प्रमुख बांधवांनी श्री सिद्धेश्वर महाराजांचा गंगाजलाने अभिषेक केला. यावेळी श्री हनुमंत (मुन्ना) भुजबळ, श्री गुंडेराव चिंदे, श्री विलास ब्याकुडे, श्री अनिल क्षीरसागर, श्री श्रीकांत म्हेत्रे यांच्या हस्ते अभिषेक पार पडला.

     महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने मिरवणुकीत माहेश्वरी समाज महिला भजनी मंडळाने भजन गायन केले. मानाची काठी मंदिरात लावण्यात आली आणि तिचे पूजन मंदिर कमिटीचे विश्वस्त श्री बाबासाहेब कोरे यांनी केले. या प्रसंगी वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ, ज्येष्ठ संचालक श्री भीमाशंकर देशमाने, श्री नागनाथ भुजबळ, सचिव श्री अजय कलशेट्टी, सहसचिव श्री इंद्रजीत राऊत, कोषाध्यक्ष श्री सुदर्शन क्षीरसागर, संचालक मंडळातील श्री राजेश्वर हरनाळे, श्री रामलिंग काळे, श्री संजय उदगिरे, श्री युवराज लोखंडे, श्री उमाकांत क्षीरसागर, तसेच समाजातील युवक, महिला माता-भगिनी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Veerashaiva Teli Samaj Performs Gangajal Abhishek & Sacred Kathi Puja During Mahashivratri Yatra in Latur Siddheshwar Temple

     या भव्य मिरवणुकीने लोखंडे बिल्डिंग, सुभाष चौक, खडका हनुमान, तेली गल्ली, पटेल चौक मार्गे सिद्धेश्वर मंदिरात प्रवेश केला. संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. समाजातील बांधवांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

दिनांक 19-02-2026 23:14:58
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in