तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग3)
सरडाच रंग बदलतो असे नाही. जेंव्हा जेव्हां मी म्हणजे मीच ही भुमीका राजा व धर्म शास्त्राला येते तेंव्हा तेंव्हा दबलेला पिचलेला समाज पर्यायाकडे नजर ठेऊन आसतो. हा समज पर्याय स्विकारतो हा या देशाचा इतिहास आहे. म्हणुन गौतम बुद्धाने समता, बंधुभाव व स्वातंत्र्य म्हणजे धर्म ही जाणीव करून दिली त्या वेळी बुद्धधर्माचा स्विकार करणारे जेजे कोण होते त्यात प्रथम तेली व नाभीक समाजातील होते. शेकडो वर्ष हा धर्म नांदत होता. या वेळी या धर्मात शिरुण शेकडो वर्ष हा धर्माच नामशेष करू शकण्याची शक्कल लढवली. पुन्हा समन्वय साधला म्हणजे जन सामन्याच्या मनात जे रूजले त्याला आपल्या सारखा आकार देऊन धर्म शास्त्राची हास्त लिखीते रचण्याचे कारखाने सुरू केले. या ठिकाणी एक गोष्ट मात्र सत्य जमेल तेवढे सत्याला वाकवुन त्याला आपल्या सारखे बनवणे व आपली हकुम ठेवणे याला ही बुद्धीमत्ता लागते. या बळावर वावरता वावरता मी पणा रूजला या मी पणात मोंगलाची आक्रमणे झाली या आक्रमणाच्या वेळी समाज पातळीवर झिडकरलेल्या अनेक जाती सामुदाई एकत्र पणे धर्मांतर करू लागल्या. आपली दावण तुटली. आपल्या कडील तिकडे गेले. ते तिकडे का गेले या विचाराने परिवर्तन करण्यापेक्षा जे गले ते जाऊद्यात उलट आहेत ते शाबुत ठेवण्यासाठी मोंगल सत्ता राबरवणारेच उच्चवर्णीय समोर आले. आपल्या मुली देऊन रक्ताची नाती निर्माण करणारी हीच मंडळी आघाडीवर होते. एवढे करून एक अलिखित करार केला आमच्या हिंदू धर्मात धर्मसत्ता आमची परंतु राज्यसत्ता तुमची सत्तेसाठी मी पणा साठी सगळ्या तडजोडी करून मोकळे होताना रंग बदलणे म्हणजे एक कर्तव्य माणने ही वाटचाल आहे.