महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या विचारांचा मोठा वारसा लाभला आहे. स्त्रीयांना सामाजिक रुढीच्या बंधनातुन मुक्त करण्याच्या चळवळीचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांनी आपल्या कार्याला पुण्यातुनच सुरूवात केली स्त्रियांच्या जिवणातील अज्ञानाचा अंधार दुर करूण शिक्षणाचा प्रकाश त्यांच्या जिवणात पसरविण्याची सुरूवात क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच मातीतुन केली. ज्या देशात, समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मान दिला जातो तो देश आणि समाज प्रगती पथावर जातात मात्र जेथे स्त्रियांकडे दुर्लक्ष केले जाते तो देश तो समाज पिछाडीवर रहातात हा जगाचा इतिहास आहे. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समानता आणि समान संधी मिळवुन देऊन त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शाररीक, मानसीक, भावनीक उन्नतीला अनुकुल परिस्थिती निर्माण झाली पाहिजे.
अशक्य ते शक्य करण्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हिरकणी, रायगडाच्या पायथ्याशी रहाणारी ही एक समान्य स्त्री पण मातृप्रेमाचे उदाहरण घालून देत अतुलन धैर्याचे दर्शन घडवीत रायगडावरील, दुर्गम कडा ती उतरली इतिहास घडविणार्या शिावाजी महाराजांनी हिरकणीला सन्मानीत केले. या कड्याला हिरकणीचे नाव देवुन तीला. अजरामर केले. असामान्य कर्तृत्व असणार्या महिला आजही समाजात आहेत त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची गरज आहे. त्यांचा आत्मसन्मान होणे गरजेचे आहे. स्त्री सन्मानाची स्त्री आदराची ही संस्कृती आणि परंपरा भारतानेच जागाला दिली आहे.
स्वत:ला प्रगत आणि आधुनिक म्हणविणर्या अमेरिकेतही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही. पण भारताने पंतप्रधान पदाच्या रूपाने इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती पदी प्रतिभाताई पाटील आशा दोन्ही सर्वोच्च स्थानावर विराजमान होण्याचा सन्मान महिलांना दिला महिलांच्या व्यथा वेदना त्यांचे प्रश्न त्यांच्या अपेक्षा आणि स्वप्नांवर चर्चा घडवून आणून त्यातुन मार्ग काढने महत्वाचे आहे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या देशाची आजची परिस्थिती पहाता स्त्रीयांच्या विकासालारोखणार्या ज्या गोष्टी आहेत त्यावर योग्य तो विचार करण्याची आणि परिस्थिती बदलण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याची गरज आहे. स्त्रीयांची प्रगती साध्य करण्यापुर्वी त्यांची आर्थीक असुरक्षीतता दुर करणे, मानसीक, शाररीक, अत्याचारांबद्दलचा भयगंड त्यांच्या मनातुन कायमचा दुर करणे गरजेचा आहे. एकीकडे भारत जगातील बलाढ्य राष्ट्र म्हणुन उदयास येत आहे. नव्या जगाची नेतृत्व करणारी महासत्ता होण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे. सारे जग भारताकडे आशेने पहात आहे. या पार्श्वभुमीवर भारततात स्त्रीभ्रुण हात्ये सारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. स्त्रीयांवरील अत्याचार वाढत आहेत कुपोषनाने बळी जात आहे. हे सारे शिक्षणाचे प्रमाण कमी असलमुळे घडत आहे. स्त्रीयांना अशा प्रकारच्या समस्या आणि संकटांना सामोरे जावे लागणार आहे. निष्पापांचे बळी जाणार नाहीत अस सुरक्षीत वातावरण आपल्याला तयार करावे लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र्य व्यासपीठ आपल्याला गरजेचे आहे. विचारांची देवण घेवान झाली पाहिजे म्हणुन महिलांना सामाजिक प्रतिष्ठा विकासाची संधी आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे.
आजचे युग जागतीकरणाचे गतीमानतेचे आणि ज्ञानाचेही आहे. या युगात देश म्हणुन , समाज म्हणुन आपल्याला अधिक सशक्तपणा जगाला सामोरे जायचे असेल तर समाजाचा अर्धा हिस्सा असणार्या स्त्रीशक्तीचा आवाजही तसाच बुलुंद असणे गरजेचे आहे.
ह्याच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.