जगात काही माणसे अशी जन्मास येतात की स्वत:चे दु:ख विसरुन इतरांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करीत असता. अतिशय कडक उन्हात एखादी थंडगार वार्याची सुखद झुळूक यावी त्यामुळे तन, मन, आनंदी बनावे असेच आण्णांचे व्यक्तीमत्व आहे. एखाद्या विशाल वटवृक्षाच्या आश्रयास अनेक पशुपक्षी येतात उन्हाने त्रस्त प्रवासी येतात व त्या वृक्षाच्या थंड छायेमध्ये सुखाचा अनुभव घेतात असेच अण्णांचे व्यक्तीमत्व आहे.
ज्या आण्णांबद्दल मी आदरांने व प्रमाणे लिहित आहे त्यांचे नाव श्री. ज्ञानेश्वर दगडु करपे असे आहे. त्यांचा जन्म तळेगाव मुक्कामी दिनांक 27/10/1943, रोजी झाला. आण्णांचे संपुर्ण बालपण अतिशय गरीबीत आणि कष्टात गेले. बालपणी आणण्णा आपल्या आई बरोबर विहिरीमधील पाणी काढून देत याचा मोबदला म्हणून त्यांना जुना एक आणा त्यावेळी मिळत असे. परंतु या गरीबीमुळे कष्ट करण्याची वृत्ती, इतराच्या दु:खाची जाणीव व परोपकाराची वृत्ती आण्णांमध्ये निर्माण झाली ती कायमची. यानंतर मुंबई मध्ये गिरगाव येथे श्री. वामन हरी पेठे यांच्या बिल्डींगमध्ये प्रभाकर पेठे यांच्या घरी एका लहान मुलावर देखरेख करण्याचे काम आण्णांना मिळाले व हे काम करीत असताना आण्णांना महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षणाची संधी मिळाली. परंतु जेमतेम दुसरी पर्यतच ते शिक्षण घेऊ शकले आणण्णा यानंतर पुन्हा गावी तळेगाव येथे आले आणि आपल्या वडीलांसोबत पिठाच्या गिरणीत त्यांनी काम केले. इ.स. 1959 ते 1969 पर्यंत त्यांनी गिरणीचे काम बघितले या कालावधीमध्येच काळाने आण्णांवर मोठा आघात केला. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. 1964 मध्ये दुर्देवाने त्यांचे पितृछत्र हरपले. आण्णांचा मोठा आधार हरपला तरीपण आण्णा डगमगले नाही. मोठ्या धीराने पिठाच्या गिरणीची सर्व जबाबदारी त्यांनी स्विकारली काही काळ व्यतित झाल्यानंतर आण्णांच्या जीवनात एक आनंदाची व चांगली घटना घडली व ती घटना म्हणजे इ.स. 1967 मध्ये सौ. रंजली बरोबर त्यांचे लग्न झाले. सौ. रजनी सारखी प्रेमळ, सुस्वभावी जीवनसाथी आण्णांना मिळाली. आण्णणांच्या सुखदु:खात सहभागी होणारी त्यांच्या कष्टात सहभागी होणारी, त्यांना धीर देणारी अशी पत्नी लाभली. अशा प्रकारे चांगला संसार सुरू असाताना या नंतर तीन कन्यारत्न प्राप्त झाली. संसारवेली वरची तीन फुुले पाहुन आणण्णा आतिशय प्रसन्न होत असत आणि ही फुले पहुन आपले कष्ट, दु:ख विसरत असत अशा प्रकारे सर्व जबाबादरी पुर्ण करीत असताना आण्णणांनी 1980 मध्ये तपस्वी गॅस एजन्सी मध्ये गॅस वितरााचे कार्य तयांनी सुरू केले. अशा प्रकारे आण्णांचा संसार सुखी, समाधानी आणि आनंदात सुरू असताना विधात्याने त्यांच्या समोर दु:खाचा डोंगर उभा केला. चांगल्या माणासाच्या वाट्यासच कधी कधी जास्त दु:खे येतात. परमेश्वर पण त्यांचीच परीक्षा पहात आसतो. परत एकदा आणणांना दु:खास सामोरे जाण्याचा प्रसंग आला. 1984 मध्ये त्यांची प्रिय पत्नी, सुख दु:खात साथ देणारी जीवनसाथी, प्रेरणा देणारी आण्णांना जीवनाच्या खडतर मार्गामध्ये अनंतात विलीन झाली. दैव आण्णांच्या नशीबाचीच परीक्षा पहात होते. परंतु याही दु:खामधुन आण्णांनी स्वत:ला सावरले. त्यांनी माता पिता या दोन्ही भुमिका पार पडत आपल्या मुलींचा सांभाळ व पुढे त्यांची लग्नेपण वैदिक पद्धतीने करून एक मोठी जबाबदारी पुर्ण केली.
आज आण्णांचे वय 71 वर्षे असुन देखिल ते सुरक्षा सैनिक मध्ये काम करीत आहे. या कामाबरोबरच समाजकार्य व इतरांना मदत करण्याची वृत्ती यात काहीच बदल घडला नाही. उलट दिवसेंदिवस आण्णा अधिकाधीक समाजसेवेत चंदनाप्रमाणे झिजत आहेत. तसे पाहात आण्णांची ही समाजसेवा 1961 सालापासुन सुरू झाली. त्यावेळी पानशेत धरणफुटले आणि पुण्यात हाहाकार उडाला. या काळात आण्णांनी पुरग्रस्तांना अनेक प्रकारे मदत केली. अनेक भुकलेल्या लोकांना अन्नदान करून त्यांचा आत्मा तृप्त केला.
आण्णाां अहोरात्र एकच ध्यास तेली समाजाचा विकास व्हावा. शिक्षण असावे आर्थिक स्थैर्य असावे याकडे आण्णांचे पुर्वीपासुनच लक्ष होते. 1967 मध्ये तेली समाजाच्या गणेश उत्सवात भाग घेतला. 1989 मध्ये तेली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद भुषविले. तळेगाव ग्रामदैवत म्हणजे श्री डोळसनाथ महाराज या ग्राम दैवताच्या सेवेतही आण्णांनी बराच काळ घालविला श्री. डोळसनाथ महाराज उत्सव समितीचे उपाध्यक्ष म्हणुन देखिल त्यांनी काम पाहिले 1989 मध्ये अंबा नदी रायगड जिल्हा येथील पुरग्रस्ताना आण्णणांनी अत्यंत मोलाची मदत केली.
मुले ही देवाघरची फुले असतात. लहान मुलांविषयी आण्णांना अतिशय प्रेम. अण्णांनी 1986 पासुन 2002 पर्यंत मुलांना शालेय, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचे कार्य केले.
गणेश उत्सवा बरोबरच दिवाळीत किल्ले बनविण्याची आण्णणांना अतिशय आवड शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप भुमंडळी या न्यायाने शिवाजी महाराजाच्या किल्यांच्या अनेक प्रतिकृती त्यांनी दिवाळीमध्ये बनविल्या व त्यामध्ये त्यांना अनेक बक्षीसे पण मिळाले. त्याचप्रमाणे त्यांनी स्वत:पण अनेक किल्यांना बक्षिस वितरीत केली.
आण्णांचे या समाज सेवेबरोबर अत्यंत महत्वाचे कार्य ते म्हणजे तेली समाजामधील मुला:मुलींची लग्ने जमविणे. अण्णणांनी अनेक गरिब मुलामुलींची लग्ने जमविलेी. या शिावाय विधवा, घटस्फोटीत यांच्या समस्या समजुन घेऊन पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाची घडी बसवुन दिली. कितीतरी विधवा व घटस्फोटीत मुला मुलींची लग्न आण्णणांनी जमवुन दिली. त्याचप्रमाणे मुला-मुलींची पण लग्ने अण्णणांनी जमवुन दिलीत. अद्याप त्यांचे फोन आण्णांना येतात व आपल्या संसारात आनंदी व सुखी आहोत सांगतात. त्यावेळी आण्णणांना खुप आनंद व धन्यता वाटते. आपले आयुष्य सार्थकी लागल्याचे वाटते. जो कोणी आण्णांच्या आश्रयला यतो तो आण्णाांचा होतो. आणि आण्णा पण त्याचेच होता. आपल्याच घरातील व्यक्तीप्रमाणे प्रत्येक मुलामुलीच्या लग्नासाठी ते प्रयत्नशील असतात.
अतिशय शांत सुस्वभावी सरळमार्ग, मनाचा मोठेपणा इतरांना मदत करण्याची वृत्ती, कार्य तत्परता ही आण्णांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. एखादे काम हातात घेतल्यांनंतर ते पुर्ण झाल्याशिावाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळेच आज अनेक मुला : मुलींची लगने जमली आहेत. अजुनही आहेत आणि पुढे पण जमणारच आहे यात कुठलीही शंका नाही.
आण्णांसारखी थोडीच माणसे या जगात असतात म्हणुनच हे जग चालले आहे. कोणतीही अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता आण्णांचे हे कार्य अव्याहत पणे चालू आहे. आणि म्हणूनच परमेश्वरांचे आशिर्वाद व सहकार्य आण्णांच्या पाठीमागे आहेत. आण्णांचे जे समाजकार्य चालू आहे ते सर्व तेली समाजासाठी अतयंत भुषणावाह आहे. आण्णांच्या समाजसेवेची प्रेरणा अनेकांनी घ्यावी. असेच त्यांचे कार्य आहे.
आण्णांना सर्वजण आणणा म्हणूनच संबोधन करतात. आण्णा म्हणजे मोठे खरच नावाप्रमाणेखच आण्णा नावाने, मनाने, स्वभावाने किती किती मोठे आहेत. आण्णणांना सर म्हणून संबोधन केलेल आवडत नाही. ते स्वत:च म्हणातत की मला सर म्हणु नका. मला आण्णा म्हणूनच हाक मारा. जितके प्रेम आपुलकी स्नेह, मता ह्या गाष्टी आण्णा म्हणुन हाक मारण्यात आहे. ते सर म्हणण्यात नाही. जितक्या प्रेमाने तुम्ही आण्णा म्हणुन हाक माराल तितक्या तत्परतेने आण्णा आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हजर.
भविष्यात आण्णांना दिर्घ आयुष्य आणि आरोग्य लभो. श्री संताजी महाराजा प्रमाणे सर्वाच्या ओठावर आण्णांचे नाव असो. एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आण्णांनी अनेकांना जे मोलाचे सहकार्य केले. त्यामधील एक म्हणजे सौ. छाया दशरथ सोनवणे, सोनवणे मॅडम सध्या तळेगाव येथे शिक्षिकेची नोकरी करीत आहेत. त्यांच्या जीवनाचा एक काळ अतिशय संघर्षाचा होता. त्याकाळात त्यांना माजी आमदार कै. बाळासोा. बारमुख यांचे प्रयत्नातुन व सहकार्यामुळे त्यांनी मला शिक्षिकेची नोकरी मिळवुन दिली. आता त्यांचा संसार सुखाने सुरू आहे. परंतु ह्या सर्व गोष्टींमागे आण्णाचें प्रयत्न आणि सहकार्य हे शब्दात सांगता येणार नाही. असे आपणा सर्वांचे अणण्णा केवळ मुला मुलींची लग्ने जमवतात असे नाही तर त्यांचा संसार सुखाचा करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
सौ. अलकनंदा रमेश परदेशाी, फलटण