देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील एैतिहासिक " जंतर मंतर " येथे देशभरातील अतिमागासवर्ग व भटके विमुक्त जमातींच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यासाठी आंदोलन केले. सध्या असलेल्या ओबीसी आरक्षणाचे (२७ %) वर्गीकरण करून ओबीसी मध्ये ३ गट पाडावेत, त्यात पहिल्या गट भटके विमुक्त जाती (९ % आरक्षण), दुसऱ्या गटात अतिमागास जाती (उदा.तेली, माळी, गोवारी, कोळी - ९ % आरक्षण) व तिसऱ्या गटात इतर मागासवर्गीय जातींचा समावेश करावा या मागणीकरिता आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय तैलिक साहू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर, भटके विमुक्त व बारा बलुतेदार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.हरिभाऊ राठोड, श्री.प्रल्हादजी मोदी, श्री कल्याणराव दळेजी, श्री योगेंद्र यादव, खा.रामदास तडस यांनी केले. या आंदोलनासाठी देशभरातून आलेल्या समाजबांधवांची उपस्थिती होती.