संघटक :- सौ. निलम अनिल घाटकर, मौर्यविहार, ओ/2, कोथरूड, पुणे - 38, मो. नं. 9890076851
आमच्या उत्कर्ष नावाची कन्या सन 2001 मध्ये उदयास आली. या कन्येचे पालक सुरूवातीला अवघ्या 15 महिला होत्या सुरूवातीला 200/- इतके पालकत्व मिळत होते. परंतु या उत्कर्ष भिशी मध्ये आता या कन्येचे पालकत्व स्विकारण्यासाठी रूपये 2000/ प्रति महिना असे झाले आहे. आता जवळ जवळ 50 महिलांनी पालकत्व स्विकारले आहे. या मध्ये कोथरूड, कर्वेनगर, वारजे या भागातील महिला सहभागी झालेल्या आहेत. दरमहिन्याच्या 10 तारखेला उत्कर्ष महिला भिशी वाढदिवसा निमित्त भिश फोडली जाते.
उत्कर्ष या भिशी मध्ये नावा प्रमाणे दरवर्षी उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला आणि गेली 15 वर्ष नुसते भिशी स्वरूप न रहाता एकमेकींच्या अडचणी समजुन घेवुन त्यावर मार्ग काढतात. अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबवले जातात. या मध्ये स्त्रीयांना मार्गदर्शन विविध संस्थांना भेट देणे, सामाजिक प्रबोधन केले जाते. महिला दिनाचे औचित्य साधुन जनसेवा फौंडेशनची कात्रज येथे अनाथ मुलांची संस्था आहे त्यास भेट देवून काही काळ करीता आमच्या भिगीनी त्या मुलांच्या आई झाल्या आणि सुखद अनुभव अनुभवला. तसेच पानशेत येथील अंबी या ठिकाणी वृद्धाश्रमास भेट देवून त्या वृद्धांचे दु:ख जवळुन पाहिले आणि समाजातील या वृद्ध लोकांना चांगली वागणुक दिली पाहिजे यांची मनेामन जाणीव झाली. जनसेवा फौंडेशनच्या संस्थांना भेटी देण्यासाठी या संस्थेचे ट्रस्टी आपल्या समाजातील श्री. वसंतराव जाधव व सौ. मंगलताई जाधव यांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
सन 2012 पासुन आमच्या उत्कर्ष महिला भिशी मंडळा तर्फे दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन सातत्याने साजरे केलेले आहेत. याचा आंम्हाला निश्चीतच सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या, कर्तबगार महिला रणरागिनींचा सन्मान केला आहे तसेच महिलांसाठी स्नेह भोजन, विविध गुणदर्शन, मोफत आोग्य शिबीर या उपक्रमांचे आयोजन केलेले आहेत. सदर कार्यक्रमांसाठी वेळोवेळी समाज भुषण मा. उपमहापौर श्री. आबा बागुल व पुणे मनपा मा. स्थायी समिती अध्यक्ष व सक्षम नगरसेवक श्री. बाबुराव चांढेरे यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शना मुळे आम्ही कार्यक्रम यशस्वी रीत्या पार ाडू शकलो.
त्याच बरोबर महिलांचे वार्षिक सहलीचे आयोजन कलेले आहे. आतापर्यंत कोकण मुंबईदर्शन अशा दोन सहली केल्या आहेत. सर्व महिलांनी चुल व मुल या सांसारीक गाड्या मध्ये न आडकतासहलीचा मनमुराद आनंद अनुभवला म्हणजे जिवाची मुंबई व कोकणातील मायाळु आणि हिरवळ पांघरून सुखद अनुभवाची शिदोरी घेवून पुढील सहल कुठे काढावी याचाच विचार करीत आहे.
सौ. प्रमिला किरवे (आजी) - मार्गदर्शक, सौ. निलिम घाटकर - संघटक,
सक्रीय महिला :- सौ. वीणा किरवे, सौ. जयश्री भोज, सो. वैशाली किरवे, सौ. सुनंदा जाधव, सौ. सुरेखा देशमाने, सौ. सुनंदा किरवे, सौ. सुरेखा दळवी, सौ. मिनाक्षी करपे, सौ. शैलजा भोज, सौ. सुनिता भोज, सौ. लक्ष्मी क्षीरसागर, सौ. वैशाली शेलार, सौ. दिपा क्षिरसागर, आणि ........