राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रथमच आमगन झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य तेली समाजबांधवांनी फटाक्यांच्या अतिषबाजीत त्यांचे स्वागत केले.
अनेक समस्यांनी ग्रस्त असलेलेव हजारो कोटींच्या कर्जाचा बोजा असलेले ऊर्जाखाते बावनकुळे यांनी अतिशय खंबीरपणे गेल्या दीड वर्षात प्रगतीपथावर नेऊन राज्यातील शेतकर्यांना, सामान्य ग्राहकांना व उद्ोजकांना चांगल्या स्वरूपात लाभ करून दिला आहे. मंत्री बावनकुळे यांनी सर्वसामान्यांची कामे तळमळीने व प्रमाणिकपणे तडीस नेली आहेत, त्यामुळेचतेली समाजाला बावनकुळे यांच्याबद्दल आदर आहे. घराच्या लोकांचा पाठींबा व कौतुकांची थाप पाठीवर असावी, जेणेकरून तेली समाजातील हे नेतृत्व आसेच दिवसेंदिवस राज्य व देश पातळीवर प्रगती पथावर रहावे ही सदिच्छा व्यक्त करून जिल्ह्यातील समस्त तेली समजातर्फे त्यांना कर्तृत्वाचे सन्मानपत्र देण्यात आले.
महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिलाच पण सर्वसामान्यांनी देखील त्यांचा यथोचित सन्मान केला.
सत्काराला उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, तळागाळातल्या सर्व घटकांचे विजेबाबतचे प्रश्न तातडीने सोडवण्याची कार्यवाही केली जाईल, जनतेने याबाबत निश्चित रहावे.
याप्रसंगी प्रांतिक तैलिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष पोपटराव गवळी, उपाध्यक्ष पोपटराव भोज, राम पडगे, जिल्हाअध्यक्ष संजय शेडगे, नितीन देशमाने, सचिव नामदेव झगडे, प्रदीप देशमाने, अनिल क्षिरसागर, वसंत खर्शीकर, रघुनाथ दळवी, शिवाय अनिल भोज, जयसिंगरव दळवी, अशोक भोज, विठ्ठल क्षीरसागर, रामचंद्र भिसे, दिलीप दळवी, बाळकृष्ण वीरकर, विवेक चिंचकर, मनोज विभुते, अनिल बेंद्रे, दत्ता देशमाने व इता समाज बांधव तसेच तालुका पातळीवरील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.