ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक संस्था, मुंडळे आपआपल्या परीने स्वागताच्या जय्यत तयारीला लागले आहेत. मात्र यंदा ठाण्यातील प्रतिष्ठीत पाच संस्था एकत्र येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहेत. यावर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील अलिखीत कराराच्या चलचित्राचा रथ तयार करणार आहेत.
ठाण्यात यंदा ठाणे महानगर तेली समाज ठाणे, श्री संताजी सहायक संघ ठाणे, श्री. संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ मुंब्रा., रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था ठाणे मंचद्वारे संयुक्तरीत्या स्वागतयात्रा काढणार आहेत. मागील वर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग लिहिण्याचे काम हे संताजी महाराज यांनी केले., तेच संत तुकाराम महाराज यांचे अभंग व संताजी महाराजांनी लिहिलेल अभंग चित्ररथात ठेवण्यात आले होते व त्यापासुन वारकरीपंथाला अवगत करून देण्यात आले होत.
यंदा मात्र स्वागतयात्रेत ठाण्यातील या विवध संस्था आणि मंडळींनी एकत्रित येऊन स्वागतयात्रेचे आोजन केले आहे, हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. यंदा स्वागतयात्रेत या संस्थेच्या वतीने चलचित्र रथाचे नियोजन करण्यात आले आहे. या चित्ररथावर संताजी महाराज आणि संत तुकाराम यांच्यात असलेले घनिष्ट संबंध आणि समाधीबाबत करण्यात आलेला अलिखित कराराचे चित्र उभारण्यात येणार आहे. चलचित्र रथात संत तुकाराम महाराज आणि संताजी महाराज यांच्यात अलिखित करार झाला होता. याचे इतिहासात दाखले आहेत. तो करार असा होता की, या दोघांपैकी जे कोणी प्रथम समाधी घेईल त्यांच्या समाधीवर तीन मुठी माती टाकायची. दरम्यान संत तुकारम महाराज यांना आलेल्या आज्ञेनुसार त्यांनी पुष्पक विमानाने वैकुंठाला प्रस्थापन केले होते, तर काही काळाने मात्र संताजी महाराज यांनी समाधी घेतली. त्या समाधीचे मुख झााकले जात नव्हते कारण अलिखित करारानुसार संताजी महाराज यांच्या समाधीवर तुकाराम महाराज यांनी तीन मुठ माती टाकायची होती. तो कारार पुर्ण न झाल्याने असे होत होते. अखेर या करारानुसार संत तुकाराम महाराजांना वैकंठातुन संताजी महाराज यांच्या समाधीवर तीन मुठी माती टाकण्यास परत याव लागले. याचेच सविस्तर एैतिहासिक दाखल्यांसह चलचित्ररथात मांडण्यात आले आहे.