वर्धा माझे माहेर पण अाता माहेर राहिलेलच नाही आम्ही दोघेच भाऊ बहिण, आई, बाबा, भाऊ, बहिणी सर्वच गेले त्यामुळे माहेरी कुणीच नाही पण माहेर या शब्दात खुप ओलावा प्रेम, सद्भाव, शक्ती सार काही समावलेल आणि हे माहेरपण अनुभवायला मिळालं रामदासजी तडस यांच्याकडे.
माझ्या अल्पबचतीच्या कामाच्या अनुषंगाने दिल्लीला रामदासजींच फ्लॉट वर थांबले शोभा - वहिणी व रामदास भाऊ स्वत: बरोबर जेवण व नास्त्याला घेऊन बसत. त्यांच्याच प्रयत्नांने जयंत सिन्हा (अर्थराज्य मंत्री) यांची भेट होवु शकली. महाराष्ट्र अल्पबचत संघटनेचे पदाधिकारी पण आले होते. मी आगदी थाटात रामदास भाऊंच्या गाडीतुन उतरले.
वेटींगरूम मध्ये सर्वजन बसलो होतो. रामदासजींच्या गाडीतुन उतरल्याने सर्वांना कतुहल होतेच. माझं माहेर व र्धा आहे. हे ही सर्वांना माहीत होतेच. पण माझ्या तोंडून निघुन गेले. की साहेब माझे भाऊ आहेत आणि माझ्या बद्दलचा आता आधिकच वृद्धीगत झाला. शोभा वहिणी पण घरच्यांसारखंच आत्मयतेनं वागत होत्या. या उभयतांचं जेवढं कौतुक करावे तेवढं कमीच आहे. एक गोष्ट मात्र माझ्या आयुष्यात रामदास भाऊंच्या रूपाने मला मिळाली ती म्हणजे माझं हरवलेलं माहेर.