वाडा हे गाव भिमा शंकरच्या पायथ्याला भिमा नदीच्या काठावर आजुबाजुला डोंगरांची सोबत. पावसाळ्यात कोसळणारा पाऊस तर उन्हाळ्यात घामाच्या धारा या गावात शेकडो वर्षे तेली समाजाची घरे मुळ धरून वसलेली. या गावातुन फार पुर्वी रावसाहेब केदारी, कै. गणपत मुकुंद केदारी यांच्या पुर्वजांनी स्थलांतर केले. रावसाहेब केदारी यांनी आपले जीवन संत संताजी या विचाराला उभे करण्यात गेले. महाराष्ट्राच्या मनावर जी आज संत संताजी प्रतिमा कोरली त्यात या केदारी घरण्याचा पराक्रम दडला आहे. विसरता येणार नाही. वाडे गावात स्वातंत्र्याच्या कालखंडात ग्रामपंचायत आली. तेल गाळप तेल विक्री करता करता कै. अनंत केदारी यांनी बाहेरील माल वाड्यात आणुन विक्रीस सुरूवात केली. डोंगर दर्यातील गावांना वाडा ही बाजार पेठ होती. याच ठिकाणी त्यांनी किराणा भुसार मालाचे दुकान सुरू केले. होलसेल व किरकोळ विक्रीचा त्यांनी पत व्यवहार सुर केला. या मुळे वाडा पंचक्रोशीत एक विश्वास संपादन केला. या परिसरात त्या काळात अमाप शेंग पिक उपलब्ध होते. त्यामुळे आशा या दुर्गम भागात ऑईल मिल उभी केली शेंग गाळप व विक्री हा घरंदाज पणा होता. या ऑईल मिलने त्यांना एक प्रतिष्ठा आली शेंग पिका बरोबर उभ्या पावसात येणार्या भातासाठी भात गिरण ही सुरू केली.
घडण करणे ही केदारी कुटूंबाची ठेवण कै. अनंतशेठ यांनी या ठेवणीला बळकटी दिली. मंडल आयोग नेमणे तो लागु होणे. या पुर्वी ते वाडा गावचे 25 वर्ष सरपंच होते. मातब्बर मराठा समाजाने जशी गावची धुरण संभळावी आगदी त्याच पद्धतीने संभाळली याच दरम्यान चासकमान येथे भीमा नदीवर धरण सर्वे होऊ लागले गावाचे व परिसराचे प्रश्न एैरणीवर आले. त्यानी धरणग्रस्तांच्या व्यथा शासनाकडे खंबीर पणे मांडल्या या दुर्गम गावांत समाज संख्या भरपूर होती. इथे ही समाजाचे संधटन करून त्यांनी समाज संस्था उभी केली. चास कमान धरणत पाणी साठवणीच्या वेळी विस्थापीत धरणग्रस्थांचे प्रश्न एैरणीवर आले. काहीना जवळच टेकडावर जागा मिळाल्या तर काही विस्थापीत झाले त्यांना शिरूर, कारेगाव भिमा येथे जावे लागत होते. व्यवसाय हा समाजाचा वारसा असल्याने त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून समाज बांधवांना मोक्याच्या जागा मिळवुन दिल्या. कै. अनंतशेठ यांना राम व लक्ष्मण, भरत, दत्तात्रय, सुनिल ही मुले तर मुलगी आळे येथे भागवतांना दिलेली सुनिल हे वाडा गावचे सरपंच होते.
श्री. दत्तात्रय अनंत केदारी यांच्याकडे सामाजीक जाणीवेची साठवण आहे. यंत्र युग आले काळ बदला या बदलत्या काळानरूप त्यांनी व्यवसायाला आकार दिला. आधुनिक तंत्र वापरून फलोअर मिल अद्यावत केली. जुनी राईस मिलइतिहास जमा करून नवी तंत्रावर भात मिल सुरू केली. कै. अनंतशेठ यंनी आसलेला व्यवसाय द्रुत गतीने सुरू ठेवला बंधु सुनिल शेठ हे वाडा गावचे सरपंच होते. सरपंच पदावर कार्यरथ असतानाच त्यांचे निधन झाले. हे दु:ख उरात ठेवुन त्यांच्या स्मरणार्थवाडा येथे दरवर्षी सामुदाईक विवाह सोहळ्याची संकल्पना उभी केली. सोबत्यांना घेऊन दरवर्षी हा सोहळा संपन्न होतो. किमान 15 ते 20 लग्न या सोहळ्यात लावली जातात. यात सर्व जाती व धर्माचे वधु वर असतात हे या सोहळ्याचे वैशिष्ठ आहे. गावातील परिसरातील समाजीक व धार्मिक कामात सहभाग या ठिकाणी ते अनेक वेळ अन्नदान करतात. अर्थीक व दुर्बल घटकातील हुशार मुलांचे दत्तक पण स्वीकारुन त्यांच्या जीवाला आकार देतात किमान दरवर्षी 4 मुले तरी ते दत्तक घेतात. संत संताजी महाराजांच्या समाधी स्थळी होणार्या पुण्य स्मरण दिनी ते परिसरातील बांधवांना योगादानाचे अव्हाण करतात. संकलीत झालेला निधीत स्वत:चा त्याग देऊन ते सुदुंबरे येथे सहभाग घेतात. सह्याद्री पर्वताच्या कडे कपारित वसलेल्या समाज बांधवांना संघटीत करण्यासाठी प. म. महाराष्ट्र तेली महासभे तर्फे जनगणना सुरू झाली. खेड तालुक्यातील जणगनना पुर्ण करण्यास सक्रिय राहिले. पुस्तक मुद्रीत करणे व भव्य सभारंभात ते अग्रेसर होते. 14 फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या ग्रामिण भागातील जो वधुवर मेळावा झाला त्यात सहभाग.
श्री. दत्तात्रय अनंत केदारी म्हणजे एक स्पष्ट मते मांडणारी व्यक्तीमत्व सत्याची कास धरावी ही वाटचाल. सर्वसामान्य विषयी कळकळ व त्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य या मुळे खेड तालुका व पुणे ग्रामिण मध्ये त्यांना माणनारा एक समुह आज निर्माण झाला आहे. त्यांच्या वाटचालीस सर्वा तर्फे शुभेच्छा.