समाजा विषयी तळमळ, त्याग व प्रेम आपण ठेवले तर समाज ही आपल्याला साथ सोबत देतो. आपल्या कामावर निष्ठा. सर्वांची मते जाणुण सर्वांना सोईस्कर निर्णय घेणे ही त्यांच्या कामाची पद्धत अनेकांची घडन करण्यास उपयुक्त ठरली आहे. मी एक तसा तैलिक समाज महासभेचा कार्यकर्ता. संघटनेने जबाबदारी दिली म्हणुन काम करू लागलो समाजाच्या कामा निमित्त त्यांना मंत्रालयात भेटण्यास प्रसंग आले. या वेळी संघटनेचा पदाधीकारी पेक्षा माझा समाज बांधव ही त्यांनी दिलेली वागणूक विसरता येत नाही. आलेला बांधव जेवला का ? नसेल तर जेवन करावयास चला ही त्यांची आपुलकी बरेच काही सांगुन जाते. मी तुमचा आहे. तुमच्यातील एक आहे. फक्त त्या मतदार संघातील आपल्या बांधवांनी मला समाज बांधव म्हणुन भरघेस मतदान केले हणुन मी खासदार झालो. ही त्यांची नम्रता पावलो पावली दिसते. ही जाणीव आजच्या बदलत्या जमान्यात सहज सापडत नाही. याहीपुढे जाऊन त्यांनी पुढचा पल्ला गाठला. खरे तर आम्ही त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. परंतु त्यांनी महाराष्ट्र मंत्री मंडळातील उपस्थीत असलेल्या काही मंत्र्यांची आमची ओळख करून ही दिली. यतुन माझा समाज बांधव कामा निमित्त आला तर त्यांना सहकार्य करा हा ही सल्ला दिला.
वर्धा जवळ हिंगणघट येथे मागील महिण्यात महाराष्ट्र तेली महासभेची सह विचार सभा संपन्न झाली या वेळी त्यांच्या कार्यक्रम नियोजनाची ओळख ही झाली. चिरंजीव पंकज ही त्यांच्या विचाराने कसे घडलेत याची तोंड ओळख ही तेंव्हा झाली. तडस साहेब सामान्य शेतकरी कुटूंबात जन्मलेले. एक खेळाडु वृत्तीचे कुस्ती हा त्यांचा केंद्र बिंदु तो त्यांनी आयुष्यभर जोपासलेला. एक दोन नव्हे तर चार वेळा ते विदर्भ केसरी. म्हणुन खासदार फंडातून बराच निधी गावो गावात पोहच करून पैलवान बनतात का हे जाणीवपुर्वक पहातात. ही त्यांची तळमळ नोंद करावी आशी आहे. त्यांच्याकडे पाहिल्या नंतर मला एक गोष्ट कळली जीवनातले चढउतार जेवढे महत्त्वाचे तेवढेच समाज प्रेम महत्तवाचे ही शिकवण ते सहज कृत्तीतुन सातत्याने देतात.