स्वातंत्र्यात सर्व समाज प्रगतीवर निघाले पण तेली समाजाचे प्रश्न त्या समाजाच्या घटकाचेच राहिले. सरकारणे बाजुला फेकलेली ही माणस. गाव गाड्यात उभे रहातात ढेपाळलेली, पेंगाळलेली, मेताकुटीस आली. पण कुठे संघर्ष केला नाही. सामुदाईक पणेएकत्र येऊन प्रस्थापीत व्यवस्था उलथुन टाकली नाही हे वास्तव सत्य जरी असेल तरी. त्यांचा फार मोठा संघर्ष नजरे आड करता येणार नाही इतकी दाहकता यात आहे. याचे जिवंत उदाहरण चास कमान धरणा जवळच्या चास गावात पहावयास मिळाले. गावात शेकडो वर्ष तेली समाज शेगा खरेदी करून गाळप करीत होता. गाळप झालेला माल स्थानिक ठिकाणी विकुन उरलेला माल बैलांच्या तांड्या द्वारे किंवा बैलगाडीतुन कोकणात विकत आसे.याच कोकणातून मीठ आणुन इथे विकत होता. शाररीककष्ट व व्यपारी वृत्ती या बळावर श्रिंमतीत जरूर नाही पण सुखाने जगत होता. या चास मधील घाटकरांची ही ओळखा होती. बाजार पेठेतील घरे ही त्यांची आजची ठेवण. स्वातंत्र्यासाठी या डोंगर दर्यात स्वातंत्र्य सैनिक आसणार्या ला ते त्यांना ही सहकार्य पुर्वज करीतहोते. स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्य ही उमेदघेऊन आले पण स्वातंत्र्यात समाजाला मिळाले काय ? जरूर मिळाले काय तर तेलघाना शारिरीक कष्टावर चालत होता. भांडवली व्यवस्थेने तो जमिनीत रूतलेला घाना उपटुन घरा बाहेर नेहला.
आसले हे जगण्याचे साधन उध्वस्त झालेले कै. रामभाऊ घाटकर यांना ज्ञानेश्वर, दामोदर, गजानन व मुलगी राधाबाई यांच्या समोर जगणे मुश्किल होते. श्री. दामोदर चिंचवडच्या रस्त्यावर गेले. तिकडे धडपडून उभे राहिले. परंतु श्री. ज्ञानेश्वर व श्री गजानन यांना गाव गाड्यात आडकावे लागले. कैकाड्या जवळुन घेतलेल्या पाटीत तेलाच्या चरब्या ठेवाव्यात कधी कधी कोकणातुन आणलेले मीठ ठेवावे. चासच्या आसपास तसे डोेंगर या डोंगरांच्य आडोश्याला वसलेल्या वस्त्या या वस्त्यावर हाळी देत तेल विकावे. या येणार्या पैशावर घर चालवावे. तेल खरेदीला पैसे नसत तेंव्हा गारीगार राजगुरू नगर मधुन आनुन वाड्या वस्त्यावर कधी साईकल वर आडबाजूला डोक्यावर घेऊन जावे. धंदाच करावयाचा तो ही कमी भांडवलाचा कष्ट करून घर चालवायचे, डोंगर दर्यात यात्रेचा काळ मोठा. मुंबईला गेलेली चाकरमानी यात्रेला येत. या यात्रेत लहान मुलांची खेळणी विकायला सुरवात केली. जत्रेतुन बरी विक्रीही होऊ लागले. दारूविक्री सोडून आसा एक ही धंदा नाही की तो या घाटकर बंधुनी केला नाही या छोट्या व्यवसायातुन त्यांना व्यवहार समजला. व्यवसायाची गणीते समजली. गिर्हाईक समजु लागले. आणी आठवडे बाजार ही एक शिक्षणाची मोठी शाळा या शाळेत ते रोजच्या रोज शिक्षित होत होते. चार पैसे साठवण करून चासच्या बाजारात किराणा मालाचे पाल टाकुन दुकान टाकले. हेच दुकान वाडा, डेहने, खेड तळेगाव, लोणावळा येथे घेऊन जावू लागले. माल खरेदी व विक्री तंत्र बसु लागले. पहाटे पाच वाजता गाड्या भरून रस्त्यावर येत व बाजार करू लागले लोणावळ्या सारखा बाजार असेल तर घरी येण्यास रात्रीचे बारा एक ही वाजु लागले. बाजारात जाताना दुसर्याची गाडी आसे. पण काही दिवसात स्वत:ची गाडी खरेदी केली. रहाते घर पुन्हा उभे करून दमलेल्या मोठ्या भांवाना एक किराणा भुसार सुरू करून दिले. श्री. ज्ञानेश्वर यांचा मुलगा हाताशी येताच तो ही यातच उभे राहिला श्री. गजानन यांना दोन मुली त्याही उच्चशिक्षित झाल्या. बाजार करणार्या गजानन घाटकरांची मुलगी बँक अधीकारी बनली तर दुसरी इंजीनीयर आहे.
बाजारात धडपडणारे श्री. गजानन घाटकर ग्रा. पं. सदस्य होते आज त्यांच्या पत्नी ग्रा. पं. सदस्य आहेत. श्री. घाटकर हे समाज विषयी अस्था असणारे. आठवड्याच्या बाजरात नुसतेच न राबता समाजाच्या प्रश्नात लक्ष देऊ लागले चास मधील समाजाला ते संघटीत ठेवतात. प. महाराष्ट्र तेली महासभेचे ते पदाधीकारी असुन त्यांनी समाजाची खाने सुमारी व वधु-वर मेळावा यशस्वी करण्यास सहभाग घेतला. घाटकर बंधुंच्या धडपडीला शुभेच्छा.