:- श्री. पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र, म. तेली महा सभा.
घार आकाशात उंच उंच झेप घेते. परंतू त्या घारेची नजर आपल्या घरट्याकडे आसते. त्या घारीची नजर त्या घरट्यातील आपल्या पिल्लाकडे आसते. त्यावर होणारा अन्याय, त्यावर येणारी संकटे ती येतात का पहाते. आसे जेंव्हा दिसते तेंव्हा ते उंच आकाशी गेलेली असतानाही काही क्षणात घरट्याकडे येते. आपले घरटे शाबुत करते, या साठी तडस साहेबांकडे पहावे लागेल ते प्रथम मार्केट कमीटीचे संचालक झाले. त्या नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष दोन वेळा आमदार अता खासदार झाले. ते आकाशात उंच उंच गेले परंतु आपली नजर आपल्या समाजाकडे देवून. हा समाज आहे म्हणुन ही सर्व झेप आहे. या समाजावर होणारे अन्याय या समाजावर येणारी संकटे ती दुर करणे माझे कर्तव्य आहे हे माणनारे. त्यांनी तेच केले व करतात ही. याचा अर्थ असा ते जमीनीवरून चालतात. या समाजा बरोबर चालताना ते अनेक वेळा आर्थिक डबघाईस ही आले परंतू जमिनीवरन चालणे त्यांनी थांबवले नाही. म्हणुन ते मानतात जे जे चांगले घडले त्याची जबाबदारी समाजाची आहे. जे जे थांबले किंवा नुकसाणीत आहे त्याला माझे प्रयत्न अपुर्ण ठरलेत. फिनिक्स गत पुन्हा उभ रहाणारा हा एक सच्चा माणुस. देवळीच्या आपल्या पुर्वजांच्या शेत जमीनीत काबाड कष्ट करणार्या एका सर्व सामान्य कुटूंबात जन्म घेतला संस्कारक्षम वयात शेतात राबता राबता तांबड्या मातीत मेहनत केली.सामान्याचे प्रश्न, सामान्याचे जीवघेणेी धडपड, सामान्यांची माणसीक ओढातान ही स्वत: अनुभवली त्यामुळे जीवनाचे सर्व लक्ष या साध्या माणसात गुंतलेले. या मुळे एक झाले प्रश्न काय आहेत. याचा शोध घ्यावा लागला नाही. प्रश्न सोडवण्यास त्यामुळे वेळ मिळु लागला. स्वातंत्र्याने काय दिले तर संविधान. या संविधानने समता स्वातंत्र्य दिले.. मी एक तेली आहे. तेली असने गुन्हा नाहीतर मी माझा आहे याची जाणीव. या देशाच्या संविधनाने सर्वाना सारखे आधीकार दिलेत. त्युळे सत्तेत सहभाग घेणे हा आपला जन्म सिद्ध अधीकार तो मी बजावणारच ही साठवण जवळ होती म्हणुन ते नगराध्यक्ष, आमदार, खासदार झाले, सत्ता असो किंवा नसो परंतु जो सामान्य माणुस आहे. त्याच्या फाटक्या पोत्यावर बसुन त्याच्या वेदना कमी करणे ही जमीनीवर चालण्याची त्यांची त्यांनीच मळवलेली वाट.
पिड्यान पिड्या सामाजीक प्रवाहात विषमतेचा धनी तेली समाज झालेला. स्वातंत्र्यात ही त्याला तेच मिळू लागले. त्याला हाक्क संविधानाने दिला पण जात दांडग्यांनी, धनदांडग्यांनी तो पळवला ही खंत उरात ठेऊन 1995 मध्ये महाराष्ट्र तेली महासभेचे अध्यक्षपद त्यांनी स्विकारले. तेली महासभा ही फक्त काही शहरा पुरतीच होती. त्या या संघटनेला महाराष्ट्रभर प्रथम ओळख करून दिली. भौगोलिक अंतर यातुन पुर्वपार पोटशाखा या पोटशाखा अंतरगत मतभेद, शहरी, ग्रामिण, गरिब श्रीमंत आसे अनेक भेद, या भेदांना आपली खरी ओळख फक्त तेली आहे. आहेरे वर्गाकडून फक्त आपण तेली म्हणुन नाके बंदी केली जाते आपले सामाजीक आर्थिक राजकीय प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत उलट ते जटील केले जाताना आशा वेळी आपण संघटने द्वारे संपवू ही त्यांची वाटचाल. समाजाचा विकास हा प्रथम झाला पाहिजे. कारण वर्धा मतदार संघात निर्णायक मत तेली मत आहे. वर्धा मतदार संघाचा काया पालट करण्यासाठी शासन दरबरात आपले प्रश्न सोडवुन कोट्यावधींचा निधी आणला यातुन विकास कामे उभी केलीत.
नम्र्रता, साधेपणा, विश्वास या बळावर त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे. ते केंद्रात मंत्री झाले पाहिजेत ही महाराष्ट्रातील समाज बांधवांची इच्छा आहे. त्यांच्या 62 व्या वाढदिवसा निमित्त त्यांना या वाढदिवसी सर्वा तर्फे सदिच्छा.