प्रकाश गिधे, म. तेली महासभा, खेड तालुका
विशेषत: सह्याद्रिच्या दर्या, खोर्यात, उजाड माळावर वसलेल्या गावात तेली समाज मुठभर वस्ती. या वस्तीतला तेली पाटला समोर हात बांधुन उभा. गावचा सरपंच दोन शब्द बोलतो ही सुद्धा वार्याची झुळूक आहे. असा अनुभवणारा समाज. आमदार किंवा खासदारांना मते देयची आसतात. त्यांची साधी भेट ही घेता येत नाही. राखीव जागेवरील पद बोगस मराठा कुणब्यांनी पळवले आहे. आशा खचलेल्या, पिचलेल्या, कोंडीत पकडलेल्या तेली बांधवांना खासदार तडस साहेबांच्या रूपाने एक संजीवनी मिळाली आहे. कारण आहेरे समजल्या जणार्या जातीतच आमदार, खासदार असतात ही आमची रोजच्या जगण्यातील वास्तवता त्यांनी संपवली आहे. लोकसंख्येने 12 टक्के असलेला हा समाज ही सत्तेचा शिल्पकार होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.
सामान्य शेतकर्याचा घरात जन्म घेतलेले तडस साहेब. अपयशाने खचले नाहीत किंवा यशाचे वारे कानात शिरून उडारले नाहीत. पैलवान असुन ही मस्ती नाही. सत्तेची गुर्मी नाही. मी तुमचा आहे. तुम्ही परके नसुन माझे आहात ही वाटचाल. श्री चंद्रकांतशेठ व्हावळ यांच्या नेतृत्वा खाली आम्ही डोंगरदर्यात वसलेल्या गावात गेलो. आगदी कडी कपारीत वसलेल्या वाडीतील एकट्या घरापर्यंत गेलो. त्याची परिचय पुस्तीका मुद्रित केली. त्याच्या प्रकाशनाला साहेब आले होते. आमची धडपड, आमचे कष्ट आमची निष्ठा पाहुन ते भारावले. त्यांनी आपल्या विचार प्रक्रियेत नमुद केले. ही धडपड पुर्ण महाराष्ट्रात आता रूजवुया चांगल्या कार्यकर्त्याला साथ सोबत देणारे तडस साहेब हे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला एक चेतना आहे हे मी या ठिकाणी नम्र पणे नमुद करतो.