आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 2) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
वर्धा ते यवतमाळ रस्त्यावर देवळी एक छोटे गाव या गावात चंद्रभानजी तडस व कौशल्याबाई या कुंटूंबात त्यांनी जन्म घेतला. घराला घर पण येण्यासाठी पुर्वपार असलेल्या शेतीत राबावे. लहरी पावसाच्या भरवश्यावर जे मिळेल त्यावर घर चालवावे घरातील पेटती चुल विझु नये ही मात्र दोघांची धडपड रोजची आसे. देवळीच्या प्राथमीक शाळेत ते शिकत होते. शाळेला सुट्टी असेल तेंव्हा रामदासजी आई बरोबर शेतात जात. आगदी एप्रिल, मे चे कडकडीत उन्ह ही अंगावर झेलत आसत. हे उन्ह व पाऊस झेलता झेलता ते वडिलांच्या सानिध्यात असत तेव्हां संत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाांबाच्या विषयी बरेच कळाले. संत गाडगे बाबा जेंव्हा देवळीला येत तेंव्हा त्यांच्या बरोबर झाडू घेऊन त्यांचे वडील असत. रात्री त्यांचे राष्ट्रीय किर्तन देवळीत असे. श्री. रामदासजी संस्कार क्षम वयात त्या किर्तनाला जात आसत. गाडगेबाबा किर्तनात सांगत समाजीक विषमता समाजासाठी त्याग, समाजाला नष्ट करणारा भेदभाव, समाजाला नष्ट करणारी हिंसा, समाजाला नष्ट कराणारी दारू, समाज घडवायचा असेल तर शरीर मजबुत करा.समाज घडण्याचा असेल तर ज्ञाना बरोबर शरीर सक्षम करा. नेमका गाडगे बाबांच्या या विचाराचा पगडा त्यांच्या संस्कारक्षम मनावर पडला. त्यामुळे पाचवी पास होताच त्यांनी शालेय अभ्यासा बरोबर खेळात लक्ष दिले. देवळीतले सवंगडी गोळा करावेत. त्यांच्या बरोबर गावभर खेळत रहावे. या खेळातुन काही गोष्टी मनात रूजल्या हा खेळ आहे हा सर्वस्व पणाला लावुन खेळला पाहिजे. सोबत्यांना खेळात साथ सोबत दिली पाहिजे कारण अंतिम विजय यावरच अवलंबून आसतो. सर्वस्व पणाला लावून यश मिळते असे ही नाही अनेक वेळा सोबतीला अपयश ही आसते. यश ज्या ताकदीने पचवु शकतो त्याच ताकदीने अपयश ही पचवने हे बाळकडू या खेळात मिळाले. संस्कार क्षम वयात ही क्षितीजे रूंदावत गेली.