आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 3) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
देवळी गावात शिक्षण घेता घेता खेळ खेळताना मनात अजुन एक गोष्ट नोंदवली गेली. कबड्डी, खोखो या सारखे खेळ सांघीक आहेत तर कुस्ती हा खेळ मुळात एकट्या पुरता आणी मराठी मातीचा हा मर्दानी खेळ. ते गावातील आखाड्यात रमु लागले जोर बैठका करीता करीता ते तांबड्या मातीत उतरले. या मातीत चितपट कुस्ती करिताना डावपेच लागतात. समोरचा ही तसाच आसतो. तो तसा आसतो म्हणुन त्याच्या डावाला प्रती डाव करणे यातच यश आसत. आगदी एस.एस.सी. परिक्षा उतर्रण होई पर्यंत ते तांबड्या मातीत असत. अजुबाजुच्या कुस्त्यांच्या फडावर ते सामील होत. आपल्या तयारीची चुणूक दाखवत आसत. चंद्रभानजी तडस यांनी आपल्या मुलाचे गुण हेरले. परिक्षा पास होताच सांगीतले रामदास तु आता या छोट्या देवळी पासुन दुर जा. नागपुर बोलावत आहे. मराठी मुलखात कोल्हापूरचा पैलवान अग्रेसर आसतो. तु नागपुर मध्ये कॉलेजात जावुन आखाड्यात जा. तांबड्या मातीत राब आणी या देवळीचे नाव माराठी मुलखात गाजव. गरजेचे साहित्य घेऊन ते नागपुरात आले. कॉलेज मध्ये जसे नाव दाखल केले तसे मराठा लान्सर्स, सुभाष मंडळ, नबाब पुर्यातील जंगी आखाडा याची ओळख करून घेतली. त्यात ते समील झाले. या वेळी नागपुरात भाऊसाहेब सुर्वे, माधव कडव, शंकर वस्ताद, ही कुस्ती क्षेत्रात बरेच शिकता आले. नागपुर विद्यापीठाचा जो कुस्ती संघ होता. या संघात त्यांची निवड झाली. ही निवड म्हणजे त्यांच्या भावी आयुष्याला एक कलाटणीच होती. कॉलेज जगात रामदासजी तडस म्हणजे कुस्ती. ही ओळख झाली. कॉलेजला व विद्यापीठाला कुस्तीक्षेत्रात एक स्वयंप्रकाशीत हिराच सापडला होता. या अंगच्या गुणा मुळे खास कुस्तीसाठी कलर ही देऊ केला. कुस्ती बरोबर ते विद्यार्थात प्रिय झाले. मागासवर्गीय विद्यार्थांच्या अडचणी, गरिब होतकरू विद्यार्थींना भेडवसणारे प्रसंग याचा त्यांनी मुळा पासुन अभ्यास केला. हे प्रश्न सोडवायला नुसती भाषणबाजी नको तर नियमात जे आहे ते मिळाले पाहिजे या साठी युवा शक्ती संघटीत करून कॉलेज व विद्यापीठा स्तरावर बरेच प्रश्न मार्गी लागले. भावी आयुष्यातील धडपडीचा हा एक शुभारंभ त्यांनी येथे केला. कोर्या पाटीवरीर जी ही मुळाक्षरे गिरवली तीच जीवनभर त्यांना उपयेगी पडलीत. हे ही सत्य. या विदर्भाच्या मातीत अनेक पैलवान झालेत परंतु सलग चार वर्ष विदर्भ केसरी हा बहुमान श्री. रामदासजी यांनीच मिळवला. कॉलेज जीवनात सन 1976 व 1978 मधय्े त्या नंतर 1980 व 1982.