आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 4 ) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
आणीबाणीच्या काळातच त्यांचे कॉलेज शिक्षण सुरू होते लोकशाहीची झालेली परवड त्यांनी पाहिली होती. शिक्षण पुर्ण होताच देवळी येथे ते आले. दमलेल्या वडीलांच्या बरोबर शेतीत त्यांनी लक्ष घातले. तांबड्या मातीत ते रमले दि.16 जुन 1977 मध्ये सौ. शोभाताई यांच्या बरोबर विवाह झाला संत गाडगे बाबा यांच्या सामाजीक परिवर्तनाचा वसा बाळगणारे चहु बाजुची माणसे ओळखून त्यांच्याशी मैत्री ठेवणारे आपले वृद्ध आई वडिल यांची काळजी घेणारे. मी घराचा कर्ता आहे याची जाणीव ठेऊन धडपडणरे कुस्ती हा तडसांचा पिंड आहे. याची जाणीव त्यांना झाली. आणी त्या या घराच्या एक घटक झाल्या या मुळेच लग्ना नंतर ही श्री. रामदासजी दोन वेळा विदर्भ केसरी बनले. श्री. रामदास जी यांनी देवळी ते दिल्ली हि स्पर्धा जिंकली या सर्व संघर्षात सौ. शोभाताईंचा सहभाग मोठा मान्य केला पाहिजे. या उभयतांना मनीषा, निलिमा, सुनिता, प्रिती ह्या चार मुली तर कु. पंकज हे चिरंजीव या चौघांची शिक्षण, लग्न, व संस्कार देण्यात सौ. शौभाताई यांनी लक्ष दिले. सर्वात लहान कु. पकंज याला ही त्या घडवत आहेत.