आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 5) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
संघटना, चळवळ, प्रश्नाची सोडवूक ही श्री. रामसजी यांची ठेवण लग्ना ंनंतर ते आपले घर व शेती पहात असताना कुस्ती बरोबर आसत. या विदर्भातील पैलवान महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे यासाठी त्यांनी देवळी येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र ही सुरू केले. यातुन वर्द्याचापैलवान घडावा देवळीचा प्रकाश राज्यात पडावा ही धडपड. आशा वेळी 1983 मध्ये सहकार महर्षी बापुरावजी देशमुख हे तडसांच्या कडे आले. वाटचाल महीत होती. धडपड माहित होती. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे श्री. रामदासजी यांची वाटचाल त्यांनी अनुभवली होती. तांबड्या मातीतला हा पैलवान सहकारात आला तर तळातल्या माणसा पर्यंत लाभ जावू शकेल ही त्यांची इच्छा होती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीची निवडणूक जवळ आली होती. त्यांनी श्री. रामदासजी यांना निवडणूक लढविण्याची विचारले. आणी निवडणुका जाहीर होताच ते कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उमेदवार म्हणुन उभे राहिले. आगदी पहिल्याच प्रयत्नात बहुमानाने विजयी झाले. ही विजयाची पहिली पायरी त्यांनी गाठली. समाज कारण व राजकारण ते या ठिकाणी एक उमेदवार म्हणुन शिकले. पुलगाव क्षेत्र तेंव्हा मोती लालजी कपुर यांच्या नेतृत्वा खाली होता. परंतु राजकीय गुरू बापुरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी देवळीत लक्ष दिले. 1985 मध्ये देवळी नगर परिषदेची निवडणूक होती सर्वांना सोबत,सर्वाना संधी, सर्वांचा हाक्क, सर्वांचा विकास ही दृष्टी ठेऊन नगर विकास आघाडी तयार केली. एक दोन नव्हे सलग 35 वर्ष देवळी गावाची सत्ता कपुर यांच्याकडे होती. या अबाधीत सत्तेला आव्हान देणे सुद्धा कठीण मग यश दुरच होते परंतु 35 वर्षात बाधीत झालेल्यांचे योग्य संघटन करून त्यांनी 35 वर्षांची सत्ता संपावुन सामान्यांची सत्ता मिळवली नगराध्यक्षपद ही सर्वांनी आपण होऊन दिले. नगराध्यक्ष पदाचा वापर सामान्य जनासाठी करणे. त्यांचा विकास हे साध्य. त्यांचे प्रश्न निकाली करणे ही धडपड ते करत होते. त्याचा एक द्रष्य परिणाम म्हणजे वर्धा व इतर जिल्हास्तरावर देवळी व तडस हे नाव गाजु लागले. 1994 मध्ये वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली मधील नगर सेवक व नगराध्यक्ष यांची प्रतिनिधीत्व करणार्या आमदाराची निवड होती. संबधीत पक्षाकडे उमेदवारी मागीतली परंतु श्री. रामदासजी चंद्रभानजी तडस हे जन्माने मराठा किंवा ब्राह्मण नाहीत तर तेली आहेत. एक तेली आमदारकीचे तिकीट मागतो ही गोष्ट पक्षातील उच्चवर्णीयांना चांगलीच खटकली त्यांनी तिकीट नाकारले. स्वातंत्र्य म्हणजे समता, स्वातंत्र्य म्हणजे भेदा भेद अमंगल, स्वातंत्र्य म्हणजे सर्वांचा विकास आणी इथे तर माझी जात आडवी येते. आजपर्यंत बहुसंख्य तेली असलेल्या या मतदर संघात जाणीव ठेवावे इतके नगरसेवक आहेत. ते वेगवेगळ्या पक्षात आहेत आणी पक्षा साठी इमान राखणरे हे बांधव मत देतात. त्यांची स्वातंत्र्यात किंमत काय ? स्वातंत्र्यात यांच्या साठी समता नाही, स्वातंत्र्यात एक तेली म्हणुन संधी नाही. स्वातंत्र्यात भेदा भेद सहन करणे म्हणजे लोकशाही नव्हे. हा जबरदस्त विचार करून श्री तडस यांनी उमेदवारी जाहीर केली. तडस विजयी तर सोडाच साधे स्पर्धेत ही राहु शकणार नाहीत ही जाणीव करून बसलेले सर्व होते परंतू समविचारी नगर सेवक व या तिन ही जिल्हस्तरावर असलेल्या तेली नगर सेवकांची मतेया बळावर ते विधानपरिषदेची निवडणुक जिंकले. आणी विदर्भातील अनेक प्रश्न ते विधान परिषदेत मांडत व न्याय द्या तो देत नसाल तर तो अन्याय कसा हे अभ्यास पुर्वक मांडत. या त्यांचा विचार प्रणालीने ते एक जागृत आमदार म्हणुन सर्वांची ओळखीस पात्र ठरले ज्यांच्या मतावर मी निवडून गेलो ही जाणीव ठेवल्या कारणाने वर्धा चंद्रपुर, गडचिरोली येथिल नगर पालीकांना विकास निधी मिळवुन देण्यास त्यांचा सहभाग मोठा. पुन्हा सन 2000 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती जि.प. सदस्य न.पा. सदस्यांच्या मतावर ते पुन्हा विधान सभेत आमदार म्हणुन निवडुण गेले.