आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 6) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
होय मी तेली आहे. मी आहे तो आहे. माझे मत तेली मत आहे. स्वातंत्र्यात सत्ते पासुन तुम्ही दुर ठेवू शकत नाही. लोकशाही म्हणजे, समता सांगते. परंतु निवडणूकीच्या फडात आमची मते हवी असतात. विकासाची साधी पाऊल वाट ही समाजाला देत नाहीत ही त्यांची खरी पोटतीडीक विधान परिषदेत ते त्याच भुमीकेने वागत. स्वातंत्र्य उत्तर काळात देशपातळीवरील सुज्ञ बांधवांनी भारतीय तैलीक साहु महासभा स्थापन झाली होती. तिचा विस्तार महाराष्ट्रात डिंग्रजचे आमदार माधवराव पाटील यांनी सुरू केला. प्रथम ही संघटना विदर्भात मुळे रोवुन उभी राहिली. समाजमाता केरकाकु क्षिरसागर यांनी मराठवाड्यात प्रांतिक अध्यक्ष म्हणुन उभी केली. त्यांची निवड देशपातळीवर अध्यक्षा म्हणुन झाली. आणी समाजाला गरज होती एक तडफदार नेत्याची समाजाला गरज होती एका संघटनेची गरज होती. बांधनी करणार्या विचाराची ही गरज ओळखुन अहमदनगर येथिल मेळाव्यात काकूंच्या मार्गदर्शना खाली श्री. रामदास तडस यंची महाराष्ट्र प्रांतिकच्या अध्यक्ष पदी निवड केली. स्व. सौ. केशरकाकु क्षिरसागर, शांतारामजी पोटदुखे यांच्या मार्गदर्शना द्वारे त्यांनी संघटन बांधणी सुरू केली सुरवात अशी होती की गावो गावी गावपातळीवर किंवा जिल्हा स्तरावर समाज संघटना होत्या यात लग्न जमविणे लग्न लावणे एवढेच एक काम होत होते. पुन्हा त्या त्या गावातले मतभेद किंवा सत्ते साठी चढाओढ आसे. या सर्व बाबी मुळे विस्कळीत पणा होता ग्रामिण भागात या ही पेक्षा मोठी शोकांतिका होती. इथे आपला समाज माझ्या जगण्या मरणचा सोबत करी कधीच होऊ शकत नाही. विस्कळीत पणा हेच आपले वैशिष्ठ आशा समाजाकडे तडस साहेब गेले. अनेक गावातील समाज बांधवांना प्रश्न पडला आरे आपण मतांचे राजे आरे आपण कुणाच्या तरी दडपणाखाली मत देणारे. आमदार किंवा खासदाराचे लांबुन दर्शन परंतू तडस नावाचे आमदार गावात येतात आगदी आपल्या टपरी वजा दुकानाला भेटुन जातात. हे आमदार चक्क तेली समाजाचे आहेत. ही त्यांची समाज भेट समाजाच्या कार्यक्रमात घडू लागली. याच समारंभात आपण तेली एक झालो तर आमदार होऊ शकतो हे समाजाला समजले. यातुनच संघटन उभे राहु शकले. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत तेली समाज10 ते 12 टक्के . विदर्भात प्रत्येक मतदार संघात 20 ते 40 टक्के मतदार तेली परंतू प्रत्यक्ष आमदार व खासदारांची बेरीज 10 सुद्धा नाही. अनेक पक्षाच्या वळचनीला प्रत्येकजन उभा आहे पक्षाची निष्ठा ठेऊन वावरत आहे. मंडल आयोग लागु झाला. हा आयोग समाजाच्या विकासाचा महामार्ग असताना आपल्या पक्षाचा नेता तिकीट देतो म्हणुन विजयी पुढे वाटचाल शुन्य. अबाधीत ब्राह्मण्या मुसलीम सततेशी इनाम राखुन हिदू धर्मात राहिलेल्यावर हुकमत ठेवलेली. माणुस पण हरवलेल्या मानव जातीला मुक्त करण्यासाठी संत तुकारामांनी विठ्ठलाच्या समोर समानतेचा झेंडा फडकवला. या महायुद्धाचे सरसेनापती म्हणुन श्री. संत संताजी जगनाडे होते. मराठी भाषा व हिंदु धर्माचा र्हास थांबवणारे जे होते त्यात संत संताजींचे नाव प्रथम घ्यावे लागते. आसे असताना या पवित्र ठिकाणाला प्रतिष्ठा येण्या साठी तडस साहेबांच्या नेतृत्वाने आमदार श्री जयदत्तक्षिरसागर यांच्या पुढकाराने 21 डिसेंबर 2013 साली सुदूंबरे येथे समाधी स्थळी तेली समाजाचा महामेळावा झाला. सर्व पक्षातील समाज बांधव इथे एकवटले आणी त्याची जाणीव सर्व राजकीय मंडळींना घ्यावी लागली. या पेक्षा महत्वाची बाब म्हणजे श्री. संत संताजींची ओळख देशपातळीवर झाली. परंतू या मेळाव्यातुन अनेकांना एक संदेश गेला क्षिरसागर, तडस यांनी हा समाज उभा केला तर पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवीताना या तेली समाजाला विचारावे लागेल. इथेच यांचे पंख छाटावेत आणी तसा यशस्वी प्रयत्न केला गेला. स्वातंत्र्यात या मंडळींनी एक अभियान राबवले होते. तुमची मते सत्ता आमची. आमच्या सत्तेत आम्ही देऊ तेवढाच वाटा. आम्ही सांगू तोच विजयी हे घमेंडी अभियान राबवणार्यांना माहित नव्हते श्री. तडस हे 4 वेळा विदर्भ केसरी झालेत. तेतांबड्या मातीतले आहेत. या मातीत त्यांनी काही कुसत्या हरल्यत पण बर्याच जिंकल्यात. ते तेली मत घेऊन उभे रहातात हा गुन्हा नसुन ते कर्तव्य मानून त्या मताशी इनाम राखतात. या मुळे देवळी मध्ये पुन्हा परिवर्तन करावयाचे ठरवून ते उभे राहिले नगपरिषदेत पुन्हा सत्ता मिळाली त्यांच्या पक्ष नेतृत्वाला जाणीव झाली विदर्भात प्रत्येक मतदार संघात 25 ते 40 टक्के तेली मतदार आहेत. विदर्भात हे मतदान ज्या पक्षला होते तोच पक्ष राज्यात सत्तेवर जावु शकतो. आणी श्री. रामदास जी तडस यांच्या धडपडीला सोबत देणारा हा समाज आहे. समाजाच्या विचाराला सोबत दिली तर यशाचा मार्ग सुखकर होईल. यातुन ना. नितीन गडकरी, मा. देवेंद्र फडणवीस यांनी विचारले. परंतू समाज समाज करीत फिरणारा मी माणुस जे जवळ होते ते ही विकुन टाकले आहे. ही निवडणुक तर खासदारकीची तेंव्हा इतका पैसा माझ्याकडे नाही. पैसा जरूर नाही. पण हा समाजाचा तुमच्यावर असलेला विश्वास हाच मुळात डोंगरा एवढ्या पैशाचा आहे. मी पणात वावरणार्या महाराष्ट्राच्या कर्त्या पुरूषाच्या नजरेतुन दुर गेलेले श्री. रामदास तडस खासदार म्हणुन निवडुन आले. मी निवडुण आलो ते फक्त तेली मतावर ही त्यांची अभिमानाची वाटचाल.