पुणे :- महाराष्ट्र शासनाने स्त्रियांना व कोणत्याही जातींना हिन लेखनेयावर बंदी केली आहे. सर्व जातीमधील स्त्रीया, दलित, ओबीसी, क्षत्रिय जाती विषयी मनुस्मृतीत पावलो पावली हिन उल्लेख केले आहेत. आशा या अमानवी लेखनाला तशी बंदी आहे. परंतु भाजपाचे शासन अस्तीत्वात येताच मनुस्मृतीला प्रसिद्ध करण्याचे धाडस पुण्यातील बापट व जोशी यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष ही करित आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांचा जाहिर निषेध व मनुस्मृतीची जाहीर होळी करण्यात आली. या साठी ओबसी सेवा संघ, ओबीसी महासभा महाराष्ट्र, तिळवण तेली समाज, विश्वकर्मा प्रतिष्ठाण, आर.पी.आय. यांच्या वतीने पुणे येथील म्हात्रे पुलाजवळ कार्यकर्ते जमले होते. मनुस्मृती विषयी श्री. गायकवाड, श्री. मोहन देशमाने यांनी मते मांडली यानंतर सर्वश्री घनश्याम वाळंजकर, सुधाकर पन्हाळे, प्रकाश कर्डिले, रामदास धोत्रे, बाळासोा. अंबिके, विष्णू गरूड, गायकवाड, शंकर नवपुते, रमेश भोज, विजय शिंदे, संजय व्हावळ, दिलीप व्हावळ, सुरेश किर्वे, आशोक सोनवणे, कुंडलीक पवार आसे शंभर समाज बांधव उपस्थीत होते. यात समाज भगीनी ही सामील होत्या. बापट, जोशी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करून मनुस्मृतीचे दहन केली.
-ः मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ