सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ आयोजित व देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्या सहकार्याने 8 मे 2016 रोजी सकाळी 10 चा. श्री. भवानी मंगल कार्यालय, तळेबाजार येथे तेली समाज बांधवांचा भव्य स्नेह मेळावा व वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास संताजी जगनाडे महाराज यांचे वंशज जर्नान जगनाडे, सिंधुुर्ग जिल्ह्याचे माजी पोलिस अधिक्षक संयकुमार बाविस्कर, मंबई नगरसेवक रूपेश वायंगणकर, मुंबई नगरसेविका किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित राहार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली व जिल्हा सचीव प्रशांत वाडेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज मंडळाला 25 वर्षे पुर्ण झाली असल्याने रौप्य महोत्सवी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 7 मे रोजी सकाळी 9 वा. कुणकेश्वर येथे समस्त तेली समाज बांधवांच्या कल्याणासाठी श्री कुणकेश्वराला लघुरुद्र अभिषेक करण्यात येणार आहे. 8 मे रोजी सकाळी 8.30 वा तळेगाजार एस.टी. स्टँण्ड येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत प्रमुख मान्यवर व जिल्ह्यातील तालुक्यातील समाज बांधव सहभागी होणार आहेत. मिरवणूकीनंतर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भवानी मंगल कार्यालयाच्या आवारातच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.
या मेळाव्याचे नियोजनासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दौर्यांचे आयोजन करण्यात आले असून या दौर्यांना उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. स्नेह व वधुवर मेळाव्यासाठी विवध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. वधुवर समितीच्या अध्यक्षपदी शिरगाव येथिल नरहरी पुरूषोत्तम तेली यांची निवड करण्यात आली आहे. नरहरी तेली यांच्या अध्यक्षतेखाली वधूवर मेळाव्याचे नियोजन केले जात आहे. या वधुवर मेळाव्याला जिल्हाभरातुन सुमारे 5 हजार तेली समाजबांधव उपस्थित रहाणार असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले. वधुवर मेळाव्याचे अर्ज सर्व तालुक्यांमध्ये उपलब्ध असुन 20 एप्रिल 2016 पर्यंत मधुबन लॉज, एस.टी. स्टॉण्ड समोर कणकवली येथे जमा करावेत. तसेच मेळाव्याच्या दिवशी सकाळी 8.30 वा. सर्व समाज बांधवांनी तळेबाजार येथे मिरवणूकीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सचीव वाडेकर यांनी केले आहे.