पुणे :- येथील तिळवण तेली समाज कार्यालयात श्री. मोहन देशमाने यांनी लिहीलेल्या महाराष्ट्राची अस्मिता श्री. संत संताजी महाराज या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करिताना मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. श्री देशमाने म्हणाले, संत तुकाराम यांचे लेखनीक हा संत संताजींचा एक भाग आहे. परंतु तुकारामांनी जी सामाजिक क्रांती केली त्या क्रांतीमधील ते एक पहिले प्रमुख आहेत. ब्राह्मणशाही व मोंगलशाही यांच्या आतेरेकी वाटचालीत त्यांनी अभंग जपले व जगाला दिले हे विसरून चालणार नाहीत. समाज बांधवांना अव्हान करिताच मदतीचा पाऊस पडला यातुन आठ हजार प्रती छापल्यात. त्या समाज बांधवांना मोफत दिल्या जाणार आहेत. श्री. संत संताजी तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री. जर्नादन जगनाडे यांनी श्री. संत संताजींच्या कार्याला उजाळा येईल. श्री. मोहन देशमाने आपल्या सुदूंबरे संस्थेत प्रसिद्धी प्रमुख आहेत. त्यांनी संस्थेच्या कार्याला हे सहकार्य केले आहे. त्यांची उचित जाणीव संस्था नजीकच्या काळात ठेवेल श्री. सुंदुंबरे संस्था अध्यक्ष या नात्याने कारभार करिताना सहकार्य मिळते तद्वत काही सहकार्य करतो म्हणतात पण करित नाहीत यावर ही त्यांनी आपले विचार मांडले.
पुणे तिळवण तेली समाजाचे विश्वस्त व माजी अध्यक्ष श्री. घनश्याम वाळुंजकर आपले विचार व्यक्त करिताना म्हणाले श्री. देशमाने हे सातत्याने समाजासाठी धडपडत असतात त्यामुळे पुणे समाज त्यांना सहकार्य ही करतो. हे संताजी चरित्र समाजाला प्रेरणा देणारे आहे. पुढे ते म्हणाले. पुणे समाजाची वास्तु र्जीर्ण झाली आहे. आमची मुदत संपली आहे. त्यामुळे सर्व समाजाला एकत्र घेऊन या इमारतीच्या पुन्हा बांधणी साठी विचार विनीमय करणार आहोत. काही रक्कम ठेवलेली आहे. व तद्वत समाज सहभागातूनही चार मजली वास्तु पुर्णत्वाकडे जाईल. यासाठी कराव्या लागणार्या सर्व बाबी पुर्ण करित आहोत. या वेळी श्री. संत संताजी चरित्रांचे मुळ संशोधक कै. कृष्णाजी नारायण वैरागी यांचे पणतू श्री. सतीश वैरागी आपल्या भाषणात म्हणाले. श्री. मोहन देशमाने यांनी माझ्या अजोबांना गुरू स्थानी जाहीर सांगुन वाटचाल केली आहे. याचे मला समाधान आहे. चरित्र लेखनाची सुरूवात माझे आजोबा, माझे वडील, भोळे आशा बांधवांनी केली आहे. संताजींच्या जीवनावर वेगवेगळ्या अगाने सखोल लेखन व्हावे ही इच्छा व्यक्त केली.
भवानी पेठ परिसरातील पुणे मनपाचे नगर सेवक श्री. विष्णु हरिहर यांच्या शुभ हास्ते पस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. त्या वेळी त्यांनी या पुस्तकाचे स्वागत ही केले. पुणे समाज कार्यालयाची वास्तु पुन्हा उभी करा. या परिसराचा नगर सेवकम्हणुन महानगर पलिकेतील प्रश्न मी सोडवून तर देईलच सोबत सहकार्य ही करेल. या कार्यकमास सर्वश्री रामदास धोत्रे, प्रकाश कर्डीले, रमेश भोज, यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी सर्वश्री बाळासोा अंबिके, अरूण काळे, अरविंद रत्नपारखी, गवळी सर सुभाष पन्हाळे संजय भगत, दिलीप व्हावळ, माऊली व्हावळ, सतीष उबाळे, संजय पवार, अनिल राऊल, गंगाधर हाडेक, अभिजित देशमाने, राऊत आज्जी, सौ. स्वाती मेढेकर, सै. प्रज्ञा देशमाने, सौ. उनावणे, श्रीमती राधिका मखामले व संत संताजी पालखी सोहळ्यातील वारकरी उपस्थीत होते.