तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 1)
कोणत्या ही संघटनेच्या वाटचालीत अव्हाने असावीत सोबतीला वादळे ही असावीत. त्या संघटनेच्या वाटचाली बद्दल चर्चा व्हावी, त्या संघटनेच्या यशा बरोबर अपयशाचा आराखडा उभा केला जावा. त्या संघटनेच्या पदाधीकार्यांच्या धोरणा बद्दल कौतुक ही व्हावे तेवढेच चुका बद्दल चर्चा ही व्हावी. आणी नुसतीच भाटगीरी असेल तर ती संघटना ही हुकूमशाहीच्या बाजुने वाटचाल करून कायमची उभी रहाते किंवा नामशेष होत आसते. हा इतिहास आसल्या कारणाने तैलिक संघटने विषयी जे सध्या वादळ उभे राहिले तेंव्हा या बद्दल जनमानसात जे चालले आहे ते मांडत आहे. मान, पद मिळविण्यासाठी, मग ते पद टिकवण्यासाठी, मग मला का हाकलुन लावले या साठी. मी म्हणतो तेच सत्य किंवा सत्य असेल ते माझे ही वृत्ती न रहाता स्व केंद्रित जी वृत्ती बोकाळलेली आहे. त्या विषयी अनेकांनी आपली मत मांडले पद जावू नये म्हणुन नाव छापु नका पण हे आहे ते असे आहे सांगणारे भेटतात. माझे पद काढुण घेतले म्हणुन राग धरणारे भेटतात. भाटगीरी करणारे जवळचे झालेत त्यांच्या माणसीक द्रारिद्री पणा मुळे अज ही वादळची सुरूवात झाली आहे हे ही विचार जवळ आले. मी तुला पद दिले मी तुला घरात बसवेन मी कोण समजुन घ्यावयाचे असेल तर व्हॉटस ऑप वर भेटत जा. भजी तळतात तसा व्हॉटसऑप तळतो मी ही प्रकृती समोर आली. त्या सर्वांचा हा मागोवा यात कुणाचा वचपा मला काढााचा नाही यात मला सत्या जवळ जावयाचे आहे. ही मांडणी म्हणजे अंतिम सत्य नव्हे हे ही मी मान्य करतो पण हे वादळ शांत व्हावे ही माझी मांडणी.
जेंव्हा आपण इतिहास विसरतो तेंव्हा
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade