तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 2)
प्रत्येक समाज बांधवाला स्वत:चे किंवा भाड्याचे घर आसते. त्या घरात वावरणार्या माणसांना त्यांचे म्हणुन संस्कार आसतात. हे संस्कार शेकडो वर्ष जपले जातात. मला स्वत: फुटपाथवर, एस.टी. स्टंड, रेल्वे स्टेशनवर परिस्थिती मुळे दिवस काढावे लागले. परंतु मोहाच्या क्षणी माळकरी वडीलांचे संस्कार समोर येत. हे या साठी मांडायचे स्वातंत्र्याच्या पहिल्या काळात देशात विखुरलेल्या तेली समाजातील अनेक पोट शाखा एकत्र आल्या त्यांनी तैलिक संघटना स्थापन केली. उद्देश काय तर समाजाचे सामाजीक संघटन व्हावे सामाजीक सांस्कृतीक प्रश्न मिटावेत. या साठी दिल्ली येथे मुहर्तमेड रोवली.. त्या काळात दिग्रज येथिल कै. माधवराव पाटील आमदार होते. त्यांनी देशपातळीवरील पदाधीकार्यांना बोलावून महाराष्ट्रभर परिषद्या लावल्या दुर्देव आसे विदर्भ वगळता याला जनाधार मिळाला नाही. पण जेंव्हा समाजमाता कै. केशारकाकु यात सामिल झाल्या तेंव्हा बर्याच बांधवांना त्यांनी याची गरज पटवुन दिली. मा. खा. शांताराम पोटदुखे यांची साथ ही मिळाली. आणी तैलीक महासभेचा पाया त्यांनी इथे निर्माण केला. त्या वेळी त्या खासदार होत्या. आशा वेळी अहमदनगर येथील सभेत त्यावळचे आमदार श्री. रामदास तडस हे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. तरूण नेतृत्व त्यात खेळाडु. संघटन कसे बांधावे याची प्रत्यक्ष अनुभवातुन जाणिव. हेवे दावे आपण मिटवायला आहो ही जिद्द. समाज जागा झाला पाहिजे ही धडपड. आपल्या साध्या शब्दाने ही समाज विस्कटु शकतो. ही नजर. या नजरेत आम्ही कुठे चुकलो किंवा समाजातील सामान्य बांधवांने जी चुक समोर आणली तर ती प्रांजळ पणे मान्य करून सुधारणे ही पैलवानी प्रकृती. आमदार जयदत्त क्षिरसागर यांच्या नेतृत्वा खाली 21 डिसेंबर 2003 साली जो महामेळावा सुदूंबरे जि. पुणे येथे झाला त्या साठी तडस साहेबांनी आपले संघटन कौशल्य पणास लावले. याच दिवसा पासुन समाजाला खर्या अर्थाने तैलिक ही एक संघटना आपली आहे. याची जाणीव झाली. समाज माता केशरकाकु क्षिरसागर यांचे मार्गदर्शन व स्थानिक पातळीवर श्री. रामदास धोत्रे यांची व संस्था अध्यक्ष श्री. अंबादास शिंदे यांची साथ सोबत तेवडीच महत्वाची आहे. तेली समाजाचे एैक्य, तेली समाजाची अफाट ताकद ही प्रथम महाराष्ट्राने पहिली आणी भावी मुख्यमंत्री हा तेली मतावर होऊ शकतो. याची जाणीव राजकारणात झाली. त्यांचे फळ म्हणजे जाणकार राजकारण्यांनी याच दिवसा पासुन फोडा व झोडाचे बीज रोपण केले. त्याची गोंडस फळे म्हणजे आजचे वादळ ही आहे. हे मी पुढे मांडत आहेच. या नंतर सन 2010 मध्ये संघटनेत अमुलाग्र बदल केले. श्री. जी.एम. जाधव यांना महासचिव पद दिले. एक दिशा दर्शक संघटक मिळाला पण इथे कुणीतरी किंवा योगायोगाने बिनसले व प्रा. भुषण कर्डीले त्यांना वडिलाकडुन ओलेला समाजसेवेचा वसा. असल्यामुळे महासचिव पद दिले त्यांनी महाराष्ट्र पिंजुन काढला कोकाण, प. महाराष्ट्र या परिसरात नावा पुरती असलेली संघटना त्यांनी उभी केली हे यश प्रथम मान्य करू. कारण समाजासाठी वेळ देणारे भेटत नसतात ते भेटले हे ही सत्य.