तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 4)
फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात एका बांधवांची भेट झाली आगदी त्यांनी दमबाज भाषेत सांगितले. बरे लिहा टिका लिहु नका. जर आसे घडलेच तर ते कुठे अडकवतील व कुठे संपवतील हे सांगता येणार नाही. दहशदवाद जो म्हणतो, दादागीरी जी म्हणतो ती हिच. तेली गल्ली मासिकाच्या सप्टेंबर 2013 च्या अंकात मी मांडले होते. (पवार व चव्हाण या नेत्याबाबत) असल्या दादागीरीचा पुरता तळपाट होतो. मराठा समाजाच्या दादागीरीचा शेवट काय झाला हे आपण पाहिलेत. मग समाज घडवायला निघलोत जाहिर सभेतगर्जना आपण करतो. तेली हा एक आहे हे पटवतो. काळानरुप वागा भेद गाडा म्हणातो पण प्रत्यक्ष काय ? कोयना नगर येथे जो तिळवणचे बोळवण करा सांगितले. पनवेल येथे कुत्र्याची उपमा दिली गेली. कल्याण येथे किडा मुंग्यांची उपमा दिली. ही व्यक्तव्य करणार्या पदाधीकारी बांधवांची भुमीका रास्त आहे ? रास्त या साठी की पोटजाती विसरल्या पाहिजेत मी स्वत: अशी 20/25 लग्न जुळवुन दिलीत परंतु त्या साठी बोळवण करणे हा शब्द सुसंस्कृत नव्हे तर पोट जाती विसरणे ही काळाची गरज असावी. स्थानीक उपरे, श्रीमंत गरिब, शाखा - पोटशाखा यात मते आहेत. यातुन वाद आहेत. परंतु कुत्र भुंकत आहे ते भुंकु द्यात म्हणने समाजाला पटले नसेल आणी या कुत्र्याच्या जागी पयार्य शब्द दुसरा आसता तर हे योग्य झाले आसते. तोच प्रकार कल्याण येथिल आहे. तेथे विचार बरोबर असतील तरी मांडणी ही समाज जळवु शकत नाही तर समाजा मध्येच संघर्ष उभा राहु शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मी हितचिंतक नव्हे तर एक आनुयायी आहे. त्यांची जयंती साजरी करतो म्हणुन विरोध करणारे काही बांधव होते. परंतु त्यांना पटले शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. हा संघर्ष कुठे करावयाचा तर तो सर्व संघटीत होऊन ब्राह्मण व मराठ्यांशी. बाबासाहेबांचे नाव सांगुन आपण चुकीचा संदेश देत असाल तर दोष समाजाचा कसा होऊ शकतो ? पद दिले, पैसा खर्च करा कार्यक्रम घ्या. आम्ही येतो आणी संघटनेची, एकीची हाक देतो. परंतू एकी होण्या एैवजी मागे बेकी माजते यातला आपला माणुस हेरून त्याला ताकद देऊन अप्रत्यक्ष बेकीला खतपाणी घालतो. उलट ती बेकी होऊ नये यासाठी पदाधीकारी म्हणुन नेमलेले काही आहेत. त्यांना तिकडे जावे लागते. ती बेकी शांत न हेता त्याचे वादळात रूपांतर होऊ लागले.