तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 6)
तेली समाजाची देशपातळीवरील तैलिक साहु महासभा 1947 च्या दरम्यान स्थापन झाली. त्यावेळे पासुन सर्व जातींची यादी समाजा समोर होती. परंतु 2014 पर्यंत मोड (मोदी) तेली समाज नावाची पोटजात आहे हे माहित नव्हते. या समाजाशी तेली समाजाशी नाते काय ? हे तेथिल प्रसिद्धी लिखीत माध्यमात झाले आहे याची माहिती तेथील ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री. सोळुंकी यांनी दिली. यांनी सांगितलेली माहिती सत्य का असत्य हे शोधण्याची वेळ आता आली आहे. राजस्थान मधील एक राजा होता. त्याचया दरबारात ब्राह्मण समाजा एवढे बनिया समाजाला स्थान होते. बहुजन समाज पार्टीच्या काशीराम व मायावती यांनी या दोन शोषन करणार्या समाजाच्या विरोधात पद्धतशीरपणे राण उठवले होते. तर स्पष्टीकरणाचा भाग असा राजाला जेंव्हा उतरती कळा आली तेंव्हा बनिया मंडळीतील काही जन गुजराथ मध्ये आले. शेंग पिकाचे मुबलक पिक व तेल गाळप विक्रिचा धंदा तेजीत होता. या बनिया मंडळींनी तेल उत्पादन व विक्रीत लक्ष दिले. आणी तेली म्हणुन स्वत: जाहीर केले. इथे मला पुन्हा शाहु महाराजांचा प्रसंग सांगवयाचा आहे. काही मागास जातितली मंडळी त्यांच्याकडे गेली व म्हणाले आमच्या समाजाचे अध्यक्ष पद स्विकारा तेंव्हा ते म्हणाले. नेता तुमच्या समाजातील असावा. त्यालाच समाजाची खरी दु:ख माहित असतात. तो समाजाच्या विकसासाठी पोट तिडकीने उभा आसतो. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकी पुर्वी आम्ही तेली म्हणुन पाठिंबा दिला. आमचे जेष्ठ भाषण ठोकतात म्हणुन कनिष्ठ हे मोदी जय जय कराचे ढोल बडवत असतात. गत वर्षात समाजाला काय मिळाले ? जे हाक्क हिरावुन घेतले जात आहेत. त्या बाबत सभा गाजवणारे बोलत नसतील तर भविष्यातील हे वादळ चक्री वादळ बनेल समाज जागेवर असेल पण भाषण विर शोधावे लागतील. कारण तेली समाजाने दादागीरी हेकेखोर पणा, वेळ येताच माती मोल केले. हा समाजाचा इतिहास सांगतो.
जय संताजी