ज्यांच्या नावातच संत एकनाथ महाराजांच्या भागवतातील प्रेम, बंधुत्व सामावलेले आहे असे साकुरी, जि. अहमदनगर येथील श्री. भागवत कचरूशेठ लुटे हे आहेत. साकुरीच्या पंचक्रोशीतले ते एक प्रसिद्ध तेल व्यपारी आहेत. त्यांचा हा पुर्वपार तेलाचा धंदा असून पूर्वीच्या काळी त्यांचे आजोबा व आजी डोक्यावर तेलाचा डबा घेऊन साकुरी, राहता, शिर्डी, नांदुर्वी, केलवड या गावी पायी चालत जाऊन तेलाची विक्री करीत. फेरीवाल्याप्रमाणे प्रमाणे माल घेऊन आवाज देऊन मालाची विक्री करणे याला हाळी करणे असे म्हणतात. असं कष्टांच काम करीत आजोबा -आजी कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत . पुढे पायी चालणं जिकीरीच झाल्याने त्यांनी सायकलवरून हाळी करण्यास सुरूवात केली.
कालांतराने भागवतांचे वडिल कै. कचरूशेठ गंगाधर लुटे यांनी वडिलोपार्जित तेल विकण्याचा धंदा सुरू केला. धंदा जसजसा वाढत गेला तसतसा सायकल मग एक बैलीगाडा नंतर दोन बेली गाडा असे तेलवाहकात स्थित्यंतर होत गेले. या व्यापाराच्या अनुंषंगाने त्यांनी अनेक माणसं जोडली आणि मानाचे स्थान मिळवले. पण सन 2010 मध्येत्यांचे अचानक निधन झाले आणि तेल व्यापाराची धुरा श्री. भागवत लुटे यांच्या खांद्यावर आली.
आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरे जात भागवतांनी वडिलांचा धंदा सुरु ठेवला. आज ते सुकरी, रहाता, शिर्डी येथे तेलाचा होलसेल व रिटेल व्यवसाय करतात. साकुरी येथे त्यांचे किराणा दुकान आहे. तरीही ते आठवड्यातुन एक दिवस गावोगावी जाऊन तेलविक्री करतात. तेली लोकही त्यांची आतुरतेने वाट पहात असतात. संभाषण कौशल्य गिर्हाइकांशी वागणुक यामुळे वडिलांप्रमाणे तेही समाजप्रिय झालेले आहेत. प्रत्येक माणसाशी आत्मीयतेने वागण्याच्या स्वभावामुळे भागवत समाजप्रिय आहेत. सुकरी येथे त्यांनी समाजविधायक कार्याला वाहुन घेतले आहे. आज ते नगर जिल्हा उत्तर तेली समाजाचे अध्यक्ष असुन. गणेश सहकारी पतसंसथा व्हाईस चेअरमन पदावर आहेत. साकुरी गावात सलग 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. साकुरी गावात समाज बांधवांच्या सहकार्याने संताजी महाराजांचे मंदिर उभारले. तेथे दरवर्षी संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते. याशिवाय त्यांनी संताजी दिनदर्शिका प्रसिद्ध केली. वधू-वर मेळाव्यात सहभाग घेऊन अनेक वधु-वरांचे लग्न जमविले. महिलांसाठी हळदी - कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून समाज संघटनेच्या प्रक्रियेत महिला शक्तीला आणण्याचा प्रयत्न केला. राहता तालुक्याची जनगणना पुर्ण केली. शिवाय समाजासाठी ते नेहमीच लहान-मोठी उपक्रम राबवित असतात. त्यांच्या समाजसेवेस शतश: शुभेच्छा !