अकोेले तालुक्यात डोंगर दर्यात वसलेल्या रिमेंडीगावात जन्म झाला या गावात लक्ष्मण व शकुंतला यांच्या गरिब घरात जन्म झाला. डोक्यावर पाटी घ्यावी व डोंगर दर्यत हाळी पाटी घेऊन जावे. जे मिळेल त्यावर घर चालवावे, आशा या ठिगळे दिलेल्या घरातुन श्री. ज्ञानेश्वर पाय पीट करीत दुसर्या गावी शाळेत जात. पुस्तके आहेत वह नाहीत वही घेतली तर पेन नाही. परंतु शिक्षणाने सुर्य मिळतो ही घरची शिकवण. शिक्षण घेता घेता काम ही करता येते. ज्ञानेश्वर हे एका गॅरेज मध्ये काम करू लागले. आणी रस्ता पकडुन चुलत्या बरोबर मुंबई पकडली. चुलत्याकडे ते लालबाग मध्ये राहु लागले. कधी किराणात काम केले कधी वायरमेनच्या हातखाली काम करु लागले. घरकाम्या म्हणुन राबावे लागे. कधी दहितुले यांच्या पुस्तक दुकानात ही काम केले. इथेच ते माणुस वाचावयास शिकले इथेच व्यवहारीक जग समजून घेऊन जगावे कसे समजेल.
विक्रोळी मधील मारूती शेलार हे मामा लालबागच्या तेली गल्लीतुन विक्रोळीच्या टागोर नगरात रहावयास गेले. तेथे शनैश्वर फौंडेशन उभी करीत होते. त्यांचे चिरंजीव श्री. नरेंद्र यांची सोबत श्री. ज्ञानेश्वर यांना मिळाली. दुर्गुडे यांना याच मामांच्या मुलाने दिशा दिली. इथेच समाजातील कामाची सवय व संस्कृती रूजली इथेच इलेट्रीशीयन हा पींड तयार झाला. बारकावे शोधुन ते घडले गेले. याच बळावर इगतपुरी येथे काम मिळाले. पण पायपीट सुरूच होती. अनुभवाच्या बळावर लोणावळा येथे काम मिळाले. या क्षेत्रातील तज्ञ ही पदवी आहे. अनुभव ही शिदोरी आहे हे नाव झाले. त्यामुळे हॉटेल क्षेत्रात एक इलेक्ट्रीशीयन म्हणुन काम मिळाले. जीवनाच्या प्रवासत स्थिरता आली मामांच्या मुळे सुदुंबरे व संत संताजी माहित होते. त्यामुळे पुण्यतिथी दिवशी ते सुदुंबरे येथे येत. यातुन ओळखी वाढु लागल्या यातुनच समाज समजुन घेता आला व ते महाराष्ट्र तेली महासभेच्या संपर्कात आले. यामुळे ते मावळ तालुका अध्यक्ष झाले. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभा त्यांनी यशस्वी पने राबविले. खाने सुमारी करण्यासाठी सोबत्यांना घेऊन तालुका पिंजुन काढला. यातुन समाज संघटन घडले. खाने सुमारी पुस्तक प्रकाशनासाठी जिल्हा कमिटी बरोबर मेहनत घेतली. त्याचे रूपांतर समाजाच्या मेळाव्यात आहे येथे दिसुन आले. पिंपरी चिंचवड येथिल संत संताजी सेवा प्रतिष्ठाण या संस्थेत काम करत आले. सन 2014 च्या वधुवर मेळाव्याचे स्वागतअध्यक्ष पद ही त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. धडपड, त्याग, निष्ठा व प्रामाणिक पणा या जोडीला सौ. निता यांची साथ सोबत यशो मंदिराकडे घेऊन गेली हे ते अभिमानाने सांगतात.