भानस हिवरा हे नेवासा नजीकचे गाव या गावात तुटपुंजी शेती श्री. सदाशीव यादव साळुंखे हे करित होते. घरातल्या घानवडीतला बैल घाना ते घेत होतो. त्यातुन तयार झालेली पेंड व तेल ते प्रसंगी हाळी पाटी करून विकत होते. स्वातंत्र्याच्या दरम्यान तेलघाना हा पारंपारिक व्यवसाय संपला या वेळी श्री. सदाशीव साळुंखे यांनी ज्वारी, गुहू, बाजरी या धान्याची खरेदी व विक्रीचा प्रथम किरकोळ व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात तसा त्यांनी लवकर जम बसविला ते ठोक खरेदी विक्रि करू लागले. याच दरम्यान नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. या कमिटीच्या आवारात अधीकृत खरेदी विक्रीचे दुकान सुरू केले. निवडणुकीत ते यशस्वी झाले. त्यांनी कमिटीच्या उभारणीत संचालक म्हणुन चांगला जम बसविला. त्यांना तिन मुले व दोन बहिणी.
त्यांचे श्री. देविदास सदाशीव साळुंके हे 1961 ला जन्मलेले चिरंजीव भानस हिवरा येथिल प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले वडीलांच्या बरोबर सातत्याने राहिल्याने व्यवसायातील बारकावे संस्कार क्षमवयात समजलेले. मराठा समाजात कसे वागावे आपल्या तेली बांधवा साठी कसे वागावे हे संस्कार श्री. सदाशिव यांच्या पासुन ते संस्कार वयात शिकले. मार्केट मधील वडिलांचा व्यवसाय आज चांगल्या प्रकारे वढविला. याच बरोबर त्या ठिकाणी ऑईल मिल सुरू करून त्यात ही जम बसविला. धान्य प्रक्रियो साठी मशेनरी उभ्या केल्या. त्यामुळे आज नगर, पुणे, औरंगाबाद या मार्केट मध्ये अपल्या ब्रँडला प्रतिष्ठा निर्माण करू शकले. देशातील इतर भागातून ही माल खरेदी करून बाजार पेढेत एक विश्वास निर्माण केला.
श्री. देवीदास साळुंखे एक प्रतिष्ठीत व्यापारी जरी असले तरी ते मुरब्बी राजकरणी आहेत. 1999 पासुन ते ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत. मध्यंतरी उपसरपंच पद ही भुषविले आहे. मराठा कुणबी हे बोगस गीरी बोकाळल्या कारणाने आपल्यावर अन्याय झाला आपण म्हणतो. परंतू समोर आसे बोगस असतानाही ते पुन्हा ग्रामपंचायत सदस्य झाले सरपंच पद हे खर्या ओबीसीं साठी राखीव आहे. हे समोरच्यांना पटवुन दिले व ते सहज सरपंच ही झाले. आपल्या कामावर विश्वास हीच फक्त जमेची बाजु तसेच राजकारणातील बारकावे हेरण्याची कसब महत्वाची आहे.
हिवरे येथिल श्रीराम ग्रामीण पतसंस्थेच्या उभारणीत सहभाग स्थापने पासुन ते संचालक आहेत. गत दहा वर्ष ते पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ही आहेत. अहमदनगर जिल्ह्या जे माथाडी बोर्ड आहे. त्या बोर्डच्या कमिटीवर ही सदस्य म्हणुन काम करीत आहेत. श्री. सदाशिव साळुंखे यांचा नेवासा मार्केट कमीटी उभी करण्यात संचालक म्हणून फार मोठा सहभाग. या मार्केट कमिटीवर श्री. देवीदास साळुंखे संचालक म्हणुन काम करित होते. या कार्य काळात ते मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन म्हणुन होते, शेतकरी व्यवसायीक यांच्या व्यवहारा बरोबरच मार्केट कमिटीचा विकास यातील बारकावे वापरल्या मुळे सुसंवाद साधणारे संचालक ही त्यांची प्रतिमा होती. म्हणुन गतवर्षी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्याची नियुक्ती मार्केट कमिटीवर तज्ञ संचालक म्हणुन केलेली आहे.
समाजाचे मन म्हणजे श्री. देवीदास साळुंखे कमिटीच्या माध्यमातुन त्यांनी समाजहित साध्य केले. समाजातील श्री. शिंदे संचालक बनवण्यास प्रयत्न केले. महाराष्ट्र तेली महासभेचेते जिल्हा पातळीवरील पदाधीकारी आहेत. तेली गल्ली मासीकाचे एक हितचिंतक आहेत. त्यांना तिन मुले आज ही तिनही मुले उच्च शिक्षीत असुन आपल्या क्षेत्रात खंबीर उभी आहोत.