शब्दांकन :- सौ. रूपाली राजेश काळे.
श्री. प्रल्हादशेठ विठ्ठल सिदलंबे (पैठण धर्मशाळा अध्यक्ष) यांचे नातु व कै. रंगनाथ बाकराव काळे यांचे पुतणे विजय वारसाने समाजसेवा मिळावी असे हे व्यक्तिमत्व कै. श्री. बाळासाहेब काळे व कै. कौसल्या यांचे तृतीय पुत्र विजय यांना आई वडिलांचे छत्र जरी लवकर गेले तरी काका कै. सदाशिव काळे व मोठे दोन्ही बंधु श्री. संजय काळे व श्री. राजेश काळे यांचे नेहमीच मार्गदर्शन मोलाची साथ मिळते.
विजय ने 12 वी पर्यंत शिक्षण करूण परिस्थिती मुळे व्यवसायात जम बसविला. तिन्ही भावांचा एकत्रित दुग्ध व्यसायात आज कृष्णाई दुध काळे हे नाव सर्वपरिचीत आहे. मोठा भाऊ माऊली गोशाळेचा अध्यक्ष तर दुसरा साईदास परिवाराचे सल्लागार असे हे धार्मिक व सामाजिक कार्य करणार्या परिवारातले.
मुर्ती लहान किर्ती कहान
असे म्हणटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण विजय घरात लहान असुन ही कुर्तृत्वाने उंच शिखरावर चढत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अहमदनगर मध्ये पुण्यतिथी उत्सवास सक्रिय सहभागी होवून सामाजिक उपक्रम राबवितात. रक्तदान शिबिर तसेच शैक्षणिक कार्यक्रम 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांस सत्कार बक्षिसे मार्गदर्शनपर व्यख्यान. यांचे आयोजन करतात.
दर महिन्याच्या 10 तारखेस सर्व समाजबांधवांना एकत्रित करूण भीशी उपक्रम राबविला जातो त्यातुन एकमेकांच्या गरजा समजुन मदत करणे समस्या सोडवणे हा उद्देश यातुनही वर्षातुन एकदा मनोरंजनात्मक क्षेत्रभेट व्हावी म्हणुन परिवारासहीत सहलींचे आयोजन केले जाते.
मागील तीन वर्षापासुन रांजन खळगे, गणपती, वेरूळ, सुंदुंबरे, देहू आळंदी इ. ठिकाणी सहली झाल्यात.
यातुन विजयच्या अंगी असलेला नेतृत्व व नियोजन हे दिसुन येतात. कारण न चुकता 10 तारखेस 100 ते 150 समाज बांधव एकत्र येतातच.
शिवुर येथिल शंकर महाराजांची पालखी स्वागत दर वर्षी आषाढी एकादशीला अहमदनगर मध्ये केले जाते. सर्व वारकर्यांची सोय केली जाते.
विजय ने भुषविलेली पदे - संताजी पतसंस्थेचे संचालक संताजी सेवा मंडळ कोषाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा तेली समाज सहसचिव, साईकृपा साखर कारखाना संचालक, एकलव्य क्रिडा मंडळ कोषाध्यक्ष नुकतेच अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष.
मागील 20 वर्षापासुन समाजकार्यात स्वत:ला झोकुन दिले आहे आज वयाच्या 41 व्या वर्षी गावात शहरात जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात विजय काळे पोहचलेत त्यांचा कार्याचा आढावा यासाठीच की तरूणांनी पुढे यांवे. मागे दोन वर्षापुर्वी सहावे चिंतन शिबिराचे आयोजन अहमदनगर शहरात करून संपुर्ण महाराष्ट्रातील तेली समाज एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
विजयच्या या कारकीरर्दीत मोलाची साथ ती म्हणजे त्यांची सुविद्य पत्नी सौ. योगिता हीची खंबीर साथ व परिवाराचा संपुर्ण पाठिंबा ! विजयच्या कर्तृत्वाचा आम्हा परिवारास सार्थ अभिमान आहे. अशी उत्त्रोत्तर पुढील वाटचाल करो आणि समाजाचे व परिवाराचे नाव करो ही शुभेच्छा ! शेवटी एवढच सांगने .
झेप अशी घे की,
गरुडानही लाजावे
पराक्रम असा कर की
पराक्रमाच्या यादीत
तुझे नाव असावे
प्रत्येक क्षेत्रात असे नाव करावं
कि सार्या जगाने तुला वंदावे.
शब्दांकन :- सौ. रूपाली राजेश काळे.