माझे वडील रंगनाथ सहादु कोटकर त्यांना तीन भाऊ श्री. सावळेराम सहादु कोटकर, श्री. लक्ष्मण सहादु कोटकर, श्री. गणपत सहादु कोटकर असुन सर्व एकत्र कुटुंब होते व व्यवसाय पण एकत्र होता. सन 1960-78 दरम्यान तेली खुंट येथे ऑईल मिल व डाळ मिल चा व्यवसाय करीत होते त्या नंतर व्यवसायात वाढ होत असल्यामुळे जागा कमी पडु लागली म्हणुन आम्ही सरदार चौक स्टेशन रोड येथे भाडे तत्वावर जागा घेतली तेथे ऑईल मिल व एक डाळ मिल चालु केली.
त्यानंतर सन. 1979 मध्ये माझे वडिल श्री. रंगनाथ सहादु कोटकर हे त्यांच्या भावां मधुन विभक्त झाले. त्यांच्या हिश्याला तेलीखुंट येथील जागा व तेथील व्यवसाय आला. त्या नंतर घाण्यावर तेल काढुन होलसेल व किरकोळ विक्री चालु केली. आमच्या वडिलांना तिन मुले व तिन मुली श्री. मदन रंगनाथ कोटकर, श्री. विजय रंगनाथ कोटकर, श्री. दत्तात्रय रंगनाथ कोटकर त्यातील मदन कोटकर हे 1987 साली विभक्त होऊन गुलमोहर रोड सावेडी येथे स्थानिक झाले. मी (विजय) व माझा लहान भाऊ दोघेही तेलीखुंट येथे राहत होते. माझे लग्न दि.20/12/1983 साली श्री. जनार्धन नामदेवराव क्षिरसागर यांच्या मुलीशी सौ. प्रमिला क्षिरसागर झाला. नंतर सन 1994 साली लहान भाऊ श्री. दत्तात्रय रंगनाथ काटेकर हा विभक्त होऊन पाईपलाईन रोड सावेडी येथे स्थायिक झाले. नंतर मी व माझी पत्नी सौ. प्रमिला विजय कोटकर आम्ही दोघेही मिळुन व्यवसाय सांभाळला. मला एक मुलगा श्री. गोकुळ विजय कोटकर त्यांचे शिक्षण झाल्या नंतर तो पण व्यवसायात मदत करू लागला. त्याचे लग्न दि. 22/1/2006 साली नाशिक येथे श्री. विठ्ठलराव माधवराव लोखंडे यांच्या मुलीशी सौ. रूपाली लोखंडे हिच्याशी झाले. आता मि विजय रंगनाथ कोटकर, सौ. प्रमिला विजय कोटकर, मुलगा श्री. गोकुळ विजय कोटकर, सौ. रूपाली गोकुळ कोटकर व त्यांचे दोन मुले यश गोकुळ कोटकर , साई गोकुळ कोटकर हा माझा परिवार सद्या तेलीखुंट येथे, स्थाईक आहे व व्यवसाय करित आहे.
शब्दांकन :- श्री. विजय रंगनाथ कोटकर