गोटा ते ब्राह्मण वाडा रस्त्यावरील डोंगर दर्यातील हे एक गाव अंगावर उन्हे घेत मी पोहचलो तेंव्हा गावात पाऊसाने नुकतीच हजेरी लावली होती. श्री. मारुती लांडे भेटले 1) मारूती 2) दत्तात्रय 3) सुरेश 4) रमेश ही कै. चंद्रकांत बबन लांडे यांना ही चार मुले. घरी पेढा बनवत तयार झालेला पेढा संगमनेर, आळे फाटा, जुन्नर, ओतुर, नारायणगाव येथे बाजारपेठेत विकत बेलापुरच्या पेढा ही एक स्वत:ची ओळख निर्माण केली. हा बेलापुरचा पेढा आज लांडे बंधु तयार करतात. श्री. मारूती यांनी दहावी शिक्षण घेताच मुंबईची गाडी पकडली। घराला पेढ्या शिवाय उद्योग नव्हता. हक्काचे साधन नव्हते शेतजमिन नसल्याने हातावरचे पोट होते. मारूती यांनी मंबईत 18 रपये रोजावर काम केले। भक्कम अशी दिशा सापडेना म्हणुन ते गावी आले. नारायणगाव येथील श्री. मनोहरशेठ दळवी हे मामा. नारायणगावच्या पंचक्रोशीत दळवी मसाला हा ब्रँड उभा केलेला श्री. मारूती यांनी मामाकडे उमेदवारी करून मसाला समजुन घेतला. प्रथम कांडप मशीन घेऊन उदयोग सुरू केला. गोटा, ओतुर कोतुळ या परिसरात लांडे बंधु मसाले वाले ही वटचाल सुरू केली. आणी काही काळात लांडे बंधु मसाल्याला मागणी वाढली. गावा बाहेर आठरा गुंठे जागा खरेदी करून व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरूप दिले. नव्या तंत्राने मसाले कांडप करू लागले. गावात वेशी जवळ दुकान सुरू केले. सोबतीला स्टीलभांड्याचे दुकान ही सुर केले. व्यवसायाला गती येण्यासाठी श्री. मनोहरशठे दळवी, श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ, श्री. तुकाराम शेठ दळवी, श्री. ज्ञानेश्वर शेठ दळवी यांचे मार्गदर्शन लाभले अल्प शिक्षीत गाव डोंगर दर्यातील परंतु श्री. मारूती यांनी बंधुंना सोबत ठेऊन लांडे बंधु मसालेवाले ही पत निर्माण केली.