श्री. रमेश सदाशिव भोज
श्री रमेश सदाशिव भोज हे मुळ रहाणार नगर जिल्ह्यातील.
कर्जत येथील, घरी तेल विक्रीचा आणि हॉटेल चा व्यवसाय हॉटेल कर्जत येथील कोर्टासमोरच होते. प्राथमीक शिक्षण कर्जत येथे झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथे झाले. त्याअगोदर मोठा भाऊ हा सुरेश सदाशिव भोज शिक्षण पुर्ण झाल्यावर पुणे येथे टेल्को सध्याची टाटा मोटर्स मध्ये नोकरी मिळाल्यानंतर पुढे सर्व भावाना पुणे येथे कोथरुड मध्ये नोकरी व्यवसाय करण्यासाठी रूम भाड्याने घेवुन राहिले. आई वडिल कर्जत मुक्कामी असताना सर्व भावांना आईचे प्रेम देणार्या सुरेशराव यांच्या पत्नी सौ. अरूणा भोज यांनी सर्व भावांसहीत योग्य मार्गदर्शन करून नोकरी व व्यवसाय यामध्ये मदत करून सकाळी नोकरी व व्यवसा यामध्ये मदत करूण सकाळी सकाळी जेवणाचे डबे बनवुण देवुन सर्वांना कामासाठी बाहेर पाठवीत असे.
पुढे मॉडर्न टेक्नीकल इंन्सटीट्युट मध्ये रमेश भोज यांनी टर्नर ट्रेड च शिक्षण घेवुन मोठे बंधु सुरेशराव यांच्या प्रयत्नाने टाटा मोटर्स मध्ये 1982 ला रमेश भोज याना कामास लावले. त्यानंतर ज्युडो कराटे यांचे शिक्षण घेवुन आपण रहात असलेल्या परिसरातील मुलांना रोज संध्याकाळी मोफत मध्ये जुडो व कराटे शिकवण्यास सुरूवात केली. नंतर आईवडिलांनाही पुणे (कोथरूड) येथे रहाण्यास आणले. सर्व भावांचे लग्नही झाली. जो तो आपआपला संसार जोमाने व उत्साहाने करू लागला. प्रत्येक जण आपआपल्या स्वत:च्या घरात राहु लागला.
9 डिसेंबर 1984 रोजी रमेश भोज यांचा विवाह अ. नगर येथील, कै. मनोहर ढवळे यांची मुलगी सौ. सुनिता हिच्या बरोबर पार पडला. आणि तेथुनच खर्या संसाराला सुरवात झाली. रमेश भोज यांना दोन मुली व एक मुलगा असे तीन अपत्ये असुन तिन्हीही मुले इंजिनियर झाले आहेत आणी तिघेही चांगल्या कंपनीत म्हणजेच टाटा मोटर्स मध्ये चांगल्या पदावर काम करीत आहे. एका मुलीचे लग्न घाले आहे. जावई आय.टी. पार्क मध्ये सर्व्हिसला आहेत.
कोथरुड पुणे येथे पतित पावन संघटनेच्या माध्यमातुन कामास सुरूवात केली अनेक प्रकारच्या आंदोलनात भाग घेतला. अशा प्रकारे समाजसेवेचं व्रतघेऊन पुढे टाटा मोटर्स मध्ये युनियन लिडर म्हणुन निडुन आलो. त्यानंतर मॅनेजमेंट व कामगार यांचा सुवर्णमध्य साधुन अनेक बेरोजगारांना कामाला लावले विशेष करून नगर भागातील अनेक समाज बांधवाचे कामे केली. आणि तेथुनच समाजसेवा करण्याचे वेड लागले. पुढे बारा वर्ष टाटा मोटर्स एम्पलाईज युनियनमध्ये कामगार प्रतिनिधिपदी निवडुन येत गेले. हे सर्व करत असतानाच तिळवण तेली समाज पुणे येथे विश्वस्त म्हणुन निवडुन आले. निवडणुकीस उभा रहाण्यासही श्री. सुरेश भोज यांनी खर्चासहित प्रोत्साहन दिले. कोथरूड येथील श्री. संताजी प्रतिष्ठाण च्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि पुणे शहर उपनगरांच्या विश्वासावर सध्या पुणे शहर व उपनगरतेली समाज विश्वस्त म्हणुन काम पहात आहे.
हे करीत असताना श्री संताजी सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आणि जबाबदारी वाढली संताजी सेनेच्या माध्यमातुन मुलांचा गुणगौरव, वारकर्यांना अन्नदान, मोफत आरोग्य शिबीरे, स्त्रीभ्रुण हत्या रॅली, मोफत शिलाई मशिन वाटप, सुशिक्षीत पदवीधर, डॉक्टर, वकील, इंजिनियर मुला मुलींचा सत्कार समारंभ वधु वर मेळावे, मोफत रिक्षा वाटप, कौटुंबीक सहली, जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार समारंभ इत्यादी अनेक प्रकारचे कार्यक्रम दिलीपराव शिंदे संतोष व्हावळ, महेश अंबिके, सुर्यकंत बारमुख, प्रितमशेठ केदारी, अरूण भिसे रत्नाकर दळवी, माऊली व्हावळ हनुमंतराव वाचकवडे, विजय हडके, महेंद्र शेलार रामदास धोत्रे, सौ. राधिका मखामले, अनिल उबाळे, मोहनराव देशमाने, सौ. निशा करपे, सौ. दिपा सुपेकर, ललीता मांजरेकर. यांच्या सहकार्याने केले.
श्री. संताजी सेना ही पुणे जिल्ह्यात समाजहित जोपसणारी एकमेव संघटना होऊन महाराष्ट्रात एक नंबर काम करणारी संघटना म्हणुन 50,000/- रूपयांचे रोख बक्षीस श्री रमेश भोज यांना मालेगाव येथे झाले संताजी सेनेच्या कार्यक्रमात मिळाले. त्याचे सर्व श्रेय हे वरील कार्यकर्त्यांना जाते. यात शंकाच नाही. हे सर्व करीत असतानाच प्रांतिक तेली महासभा कार्याध्यक्ष पुणे जिल्हा ही जबाबदारी काही काळ कार्य करून पार पाडली त्यानंतर वरील सर्वच कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने संतजी ब्रिगेड या संस्थेची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष म्हणुन माझी एकमताने निवड करण्यात आली त्याही दाला योग्य न्याय देवुन अनेक कार्यक्रम घैतले जात आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताजी ब्रिगेडची स्थापना झालेली आहे आणि एकंदरीत चांगल्या प्रकारचे काम सध्या महाराष्ट्रात चालु आहे. ते ही सर्व समाज बांधवांच्या सहकार्यानेच असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
नंतर पुढे पुढे सुंदुंबरे संस्थानचे अध्यक्ष श्री. जनार्धन जगनाडे यांनीही संसथेचे कार्यकारीणी सदस्य पद निवड करूण श्री संताजी जगनाडे महाराज संस्था सुंदबरे येथे सेवा करण्याची संधी दिली हे मात्र श्री संताजी महाराजांच्या आशिर्वादानेच .......
या सर्व सामाजिक कामाचा अढावापहाता ओबीसी सेवा संघ पुणे जिल्ह्याध्यक्ष पदी माझी निवड केली गेली हि निवड तेली गल्ली या समाज मासीकाचे संपादक आण ओबीसी सेवा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री. मोहनराव जी देशमाने यांनी केली. आणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या ओबीसींचे काम पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात जोमाने व जोराने चालु आहे. साहित्य संमेलन खर्या ओबीसींवर होणारा अन्याय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर अनेक प्रकारचे ओबीसींचे आंदोलने अशा सर्व प्रकारचे कार्यक्रम सध्या चालु आहेत आणि त्याला सहकार्य श्री. मोहनराव देशमाने यांचेच आहे.
श्री संताजी प्रतिष्ठाण कोथरूड येथे संघटक म्हणुन काम पहात असुन नुकताच एक वधु वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे कार्याध्यक्ष म्हणुन जबबदरी पार पाडली. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील कनाकोपर्यातील समाज बांधव हजर होते. या मेळाव्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मोफत प्रवेश होता.
हे सर्व सामाजिक काम आपली नोकरी सांभाळुन घर संभाळुन कामाचे खाडे न होता आणि विशेष करुन त्यांच्या पत्नीच्या सहकार्याने सौ सुनिता भोज यांच्या मदतीनेच ते करू शकले असे ते अभिमानाने सांगतात अता गरज आहे तुमच्या आशिर्वादाची सहकार्याची आणि प्रेमाची.
जय संताजी.
श्री. रमेश सदाशिव भोज,
बी. 6/10 आनंदघन इंदिरा शंकर नगरी, पौड रोड , कोथरूड, पुणे 38
मोन न. 9604767068