श्री बद्रिनाथ पंढरीनाथ लोखंडे, रा. वारी, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर, सध्या शिर्डीत स्थाईक
शिक्षण 11 वी पर्यंत परिस्थीती बिकट असल्यामुळे लवकरच कामाची जबाबदारी वीट बनविण्याचे काम केले. त्यानंतर आठवडे बाजार कपड्याचा छोटासा धंदा चालु केला. पुन्हा छोटे गावात जनरल स्टोअर्स चालु केले. त्यात उन्नती म्हणुन मोठ्या भावासाठी रिक्षा घेतली. साईबाबाच्या पुण्यनगरीत व्यवसाय चालु केली काही कारणास्तव ती जबाबदारी माझ्यावर आली. काही दिवस गेले त्यात श्री सोपानराव (काका) वाघचौरे यांच्या हॉटेलवर पानटपरी चालु केली त्यात मला समाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजाचे काम करण्याची संधी मिळाली व शिर्डीत मोठा तेली समाज असल्यामुळे सांघीक वातावरण तयार झाले. पुढे तालुका संघटनाचे काम चालु झाले त्यात मला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. ती मी जबाबदारीने पुर्ण करत आहे. आज नगर जिल्ह्यात राहाता तालुक्याचे काम मोठ्या आघडीवर आहे. संताजी महाराजांची दिनदर्शिका आम्ही चार वर्षापासुन करत आहोत. प्रतिमा पुजन, नविन उपक्रम चालु केला त्यात सुद्धा यश मिळाले असा माझा छोटासा परिचय आज मी हॉटेल पुष्पक शेजारी माझे जे दुकान आहे. त्यात मी समाधानी आहोत. पुढे गाडी व्यवसायात पर्दापण केले आहे. स्वत:चे घर आहे एक मुलगा व एक मुलगी आहे. संताजी महाराजांच्या आशिर्वादाने सर्व चांगले आहे.
सर्वांना जय संताजी