जामखेडच्या शेतांना पाऊसाचे छत व पाण्याची रिप रिप फार कमी. त्यात श्री. चंद्रकांत दत्तात्रय टेकाळे यांनी घराच्या डबघाईला टेकु देण्यासाठी सातवी पास होताच हाताला काम मिळवुन ते टेकु देऊ केला. जमला व्यवसाय केला नाहीच जमला तर दुसर्याकडे काम ही केले. परंतु अशोक व संजय या मुलांना संस्कारित करू लागले. किती इमारती आज उभ्या केल्या या पेक्षा कशी मुल घडली हे महत्वाचे कारण ही घडवलेली शिक्षित मुले प्रगतीचे उंच उंच टप्पे सहज गाठु शकतात हा त्यांचा विश्वास होता. 1972 च्या दुष्काळात शेतात पिकलेले नव्हते तेंव्हा त्यांनी रहात्या घरी छोटेसे किराणा दुकान चालु केले. श्री. चंद्रकांत टेकाळ्यांनी दिड एकर शेती संभाळत वाटचाल करताना. जामखेट मर्चंड स. बँकेत सलग 10 वर्ष संचालक म्हणुन काम केले. त्यांना श्री. अशोक व श्री. संजय ही दोन मुले यांनी गवातील किराणा दुकानात उमेदवारीच्या काळात लक्ष दिले. 1993 मध्ये जामखेड मार्केट यार्डात भुसार मालाची खरेदी विक्री सुरू केली. आज या मार्केट यार्डात एक विश्वासु पत निर्माण केलेले हे बंधु आहेत. बदलत्या काळानरुप नवीन मशनरी घेऊन महाराष्ट्रात व देशात आपल्या ब्रॉडचे नाव निर्माण केले आहे. श्री. संजय हे पदवीधर आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मागे न जाता त्यांनी व्यवसयात लावला पक्षीय राजकारणा पासुन दुर राहुन व्यवसाय व समाजकार्य करणे हा छंद जोपासला नगर व पुणे येथील वधु-वर मेळाव्याला सक्रीय सहभाग. नगर जिल्हा तेली महासभेचे क्रियाशिल सदस्य श्री. संजयशेठ या माध्यमातुन जामखेड तालुका तेली बांधवांच्या विकासाला हातभार लावतात.