शिर्डी, संगमनेर अकोला मधील बाजार पेठेत राजुरचा पेढा म्हणजे एक दर्जेदार पेढा म्हणुन मागणी आसते. मला या पेढ्याचा शोध घ्यावयाचा होता. अकोले तालुक्यातील राजुर हे बाजारपेठेचे गाव या गावात तेली समाजाचा ताबा बाजार पेठेवर. चौकशी करीत श्री राम दशरथ पन्हाळ यांच्याकडे गेलो. राजुर पेढा समजावुन घेऊ लागलो रामाजी मुक्ताजी पन्हाळे हे श्रीराम यांचे आजोबा आपल्या घरच्या गाई म्हशी पासुन पेढे बनवत व तो किरकोळ विकत कै. दशरथ पन्हाळे हे वडिल परिसरातील यात्रेवर मिठाईचे दुकान लावत. यरात्रेत पेढ्याला मागणी आसे. यात्रा काय वर्षभर भरत नसत इतर वेळी काय करावयाचे हा प्रश्न होता ? ते मुळात शोधक व जिज्ञासु वृत्तीचे होते. यात्रा हा जोड धंदा झाला मुख्य धंदा वेगळाच पाहिजे याचा शोध घेऊ लागले. पेढे व्यवसायाचे गणीत माहित होते. या साठी त्यांनी मुंबई इगतपुरी या ठिकाणाची बाजारपेठ समजुन घेतली. या पेठेतील पेढ्याची उलाढाल समजुन घेतली गोल चपटा असा आकार देऊन राजुर पेढा हे नाव त्यांनी दिले. ही बाजार पेठ कवेत घेतली. या मुळे राजुर पेढा ही एक वेगळी चव निर्माण झाली. बेळगावचा कुंदा, सातारचे कंदी पेढे तसा राजुरचा पेढा हा प्रसिद्ध झाला. मला या पेढ्याचे वगळे पण सांगताना श्री. श्रीराम म्हणाले. राजुर हा परिसर भंडारदा धरण व कळसुबाई परिसरातील. जिकडे जावे तिकडे उंच उंच डोंगर व खोल खोल दर्या. उभ्या पावसात वाढणारे गवत. या गवतावर चरणार्या गाई - म्हशाींचे तांडेच आहेत. हे नैसर्गीक गवत हे त्यांचे खाद्य. गवतावर कोणतीच रासायनीक प्रक्रिया नसते. त्यामुळे गाई म्हसींचे प्रमुख खाद्य हे नैसर्गीक आसते. म्हणुन आमचा राजुरचा पेढा शिर्डीची बाजार पेठ जिंकु शकला. आमच्या पिढीने वडला नंतर तीच चव तोच पोष्टीक पणा टिकवुन शिर्डीला रोज दानशे किलो पेढा पोहच करावयास सुरूवात केली. श्री. राजेंद्र दशरथ पन्हाळे यांनी या व्यवसायात तसा बर्यापैकी जम बसवला. श्री. अभिजित श्रीराम पन्हाळ हे स्वत: पदवीधर आहेत. नोकरी न करता त्यांनी घरच्या राजुरच्या पेढ्यात लक्ष दिले. आज नुसता फक्त पेढा बनविणस 10/12 कामगार रोज राबत असतात. किमान 1000 किलो पेढा हा शिर्डी येथे जात आसते. दुध खरेदी, पेढा विक्री, पेढा निर्मीती हे सर्व श्री. अभिजीत पन्हाळे स्वत: पहात आहेत.्र आणी राजुर पेढ्याला प्रतिष्ठा देत आहेत.
श्रीराम यांनी आपल्या बाजार पेठेतील घरात छोटा उद्योग सुरू केला. व्यापार किरकोळ व भांडवल कमी परंतु थोड्याच काळात बाजार पेठेतील केंद्र बनले. भांड्याचे दुकान, घरगुती समानाचे दुकान, बांधकाम साहित्याचे दुकान ते एकटे संभाळतात दुपारी 11 ते 5 पर्यंत त्यांना निवांत पणा मिळत नाही बाजारच्या दिवशी त्यांचे तोंड ही सहज सापडत नाही. ही प्रगती राजुरच्या पेढ्याने केली हे अभिमानाने सांगतात.