कै. बाळासाहेब कर्पे हे संगमनेरचेच ते गावकामगार तलाठी म्हणुन काम करीत होते. सचोटी प्रमाणिक पणा सेवा व त्याग हा केंद्र बिंदु या खात्यात दुर्मीळ पण ते आपल्या विचाराने जगले. अगदी माल पाणी यांच्या इमारतीत बराच काळ भाडेकरू म्हणुन होते. त्यांना 3 मुले व मुली होत्या. यांना मोठे करित असतानाच आपल्या सारख्या भाडेकरूंचे घराचे स्वप्न साकार करण्यसाठी त्यांनी श्री. गणेशगृहनिर्माण सोसायटी स्थापन करून त्यांनी अनेक सोबत्यांना स्वत:चे घर तयार करण्यास हातभार लावला. ते 1985 मध्य वारले. त्यांचे चिरंजीव श्री. शाम कर्पे यांनी जबाबदारी स्विकारली श्री. शाम यांच्यावर लहान पणापासुन वडिलांचे व हिंदु धर्म निष्ठ संस्कारांचे बिजरोपण झालेले. हे संस्कार म्हणजे जीवनाची शिदोरी म्हणुन आज ही संभाळतात. माझे घर संभाळुन समाज सेवा निष्ठेने व त्यागाने करणे. सत्य जे आहे त्यासाठी उभे रहाणे. त्या साठी प्रसंगी संघर्ष ही करणे ही विचार प्रणाली. कचर पतसंस्था उभारणीत सहभाग घेतला. आज गत 15 वर्षा पासून ते संचालक म्हणुन काम पहात आहेत. अक्षय नागरी पतसंस्था ही समाज बांधवांची उभी केली. ती उभारण्यात सहभाग. पडत्या किंवा अडचनीत काळ येताच ते संस्था सावरण्याबाबत मग्न असतात. संगमनेर शहरात असलेल्या जयहिंद नागरी पतसंस्थेत ते संचालक म्हणुन ही कार्यरथ आहेत. सहकार प्रणालीवर विश्वास सहकार प्रणालीतुनअनेकांच्या विकास त्यांनी साधला आहे. महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधीकारी म्हणुन कार्यरथ आहेत. राजकारणात सहभाग कोणाचे ही हायबा न बनता राजकीय काम करणे मंत्र्या पासुन नगर सेवका पर्यंत एक दबाव गट निर्माण केल्यामुळे. तेली समाजातील काही अडचणीत आलेल्या बांधवांना त्यांनी त्या दबाव गटा द्वारे न्याय मिळवुन दिला आहे.
वडिल नोकरी संभाळुन समाज कार्यात असत तोच वसा त्यांनी जीवनभर गिरवीला आहे. तेली समाज संस्थेत सहभाग, समाज हित, संस्था हित यात लक्ष देतात. गेली 4/5 वर्ष तेली समाजाची आकर्षक दिनदर्शीका मुद्रीत करून बांधवांना मोफत देतात. या साठी येणारा खर्च समजातुन गोळा करतात. या मुळे प्रत्येक समाज बांधवाच्या भिंतीवर संताजी विचार नजरे समोर रहतात. महाराष्ट्र तेली महा सभेच्या संगमनेर तालका पातळीवर पदाधीकारी म्हणुन काम पहातात. समाजाची खाने सुमारी. त्या साठी ते प्रत्येक घरात गेले. ती संकलित माहिती पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध ही केली आज अनेक ठिकाणी याची सुरूवात झाली. परंतु सन 2000 मध्ये हा यशस्वी प्रयत्न त्यांनी संगमनेेर मध्ये यशस्वी पणे राबविला आहे.
तसे शाम कर्पे हे उच्च शिक्षित आहेत. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ते व्यवसायाकडे वळले जीवनाची सुरूवात त्यांनी दुध विक्री पासुन केली. सलग 10 वर्ष ते दुध डेअरी चालवित होते या नंतर त्यांनी व्यवसाय बदल करावयाचे ठरविले. जमीन, खरेदी विक्री व बांधकाम या क्षेत्रात ते उतरले. हा व्यवसाय तसा बेभरवशाचा. पण त्यांनी इथे आपली एक पत निर्माण केली आहे. कोणाला अडचणीत नेहुन कुणाला फसवुन चार पैसे कमविण्या पेक्षा त्यांनी इथे सचोटीची मोजपट्टी लावली यातुन चार पैसे मिळालेच पण अनेक सुखी कुटूंबांचा विश्वास हे ते संपादन करू शकले. या मुळे संगमनेर परिसरात कृष्णा इस्टेट ही एक विश्वासाची पत निमार्र्ण करू शकले. स्पषट विचार, स्वच्छ व्यवहार, मी सुखी झालो इतर ही व्हावेत ही प्रणाली यामुळे ते सर्वत्र पर्यंत परिचित झालेत. कर्पे यांच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा.