श्री. मोहन देशमाने प्रसिद्धी प्रमुख श्री संत संताजी म. तेली संस्था सुदूंबरे
तेली गल्ली (गावकुस) मासिकाची सुरवात होती माझे सासरे कै. गणपतराव खोंड व कै. गणपतराव भांडकर यांचे स्नेहसंबंध होते. घरात नेहमी चर्चा होत असे आणि तोच धागा पकडुन मी पार्थडी च्या स्टँडवर उतरलो. भांडकरांची स्ँडड वर चौकशी केली बबनराव भांडकर कुठे आहेत. तेंव्हा समजले स्टँड समोरची या टोका पासुन त्या टोका पर्यंतची जी इमारत आहे ती बबनराव भांडकरांची उंची पुरी मुर्ती अंगात लेंगा शर्ट डोक्यावर टोपी असलेल्या भांडकरांची भेट झाली. या पहिल्या भेटीला त्यांनी विश्वास दिला माझ्या कडून विश्वास घेतला सुद्धा. आशा या जगाला गवसनी घालणार्या पण जमिनीवर चलणार्या समाज बांधवाच्या जीवन प्रणालीची एक साठवण.
पैैलवानकी ते नट बोल्ट व पाने
कै. गणपतराव भांडकर हे पैलवान नावाचे पैलवान नव्हते तर त्या काळात बिड, पुणे, नगर औरंगाबद या परिसरात होणार्या कुस्त्यांच्या फडात त्यांनी शेकडो कुस्त्या चितपट केल्या होत्या. आपल्या डाव व प्रतिडाव मुळे ते प्रसिद्ध होते. गणपतरावांचे नाव घेताच फडावर मी मी म्हणारे पैलवान दबकत आसत. हा दरारा त्यांनी निर्माण केला होता. स्वत:च्या घरात तालिम बनवणरे ते पहिले पहिलवान असावेत. याच जागेत ते मेहनत करीत अनेक सोबत्यावर डापेच करित यातुन त्यांनी स्वत: आनेक पैलवान निर्माण केले. त्यांचे मोठे चिरंजीव बबनराव. त्याकाळी महसुलाचे मुख्य ठिकण म्हणजे पाथर्डी गाव होते. तरी सुद्धा गावात शिक्षण मिळण्याची वणवा होती. पारतंत्र्याच्या काळात ही सोचनीय अवस्था असतानाही त्यांचे शिक्षण थांबवले नाही. त्यांना नगर येथे मजल दरमजल करीत नगर येथे पाठविले. इंग्रजी शाळेत चौथी पर्यंत शिकले. परंतु बबनराव यांचा धडपड्या स्वभाव त्यांना शांत बसु देत नव्हता. शिक्षणा पासुन ते बाजुला झाले व पाथर्डी गावात आले. याच गावात त्यावेळी साधे हॉटेल ही नव्हते. नगर मध्ये पहिले हॉटेल अगदी तसे हॉटेल प्रथम सुरू केले. पुर्ण पाथर्डी शहरात इंग्रजी समजणारे व बोलणारे फक्त बबनरावच होते. त्यामुळे तालुक्याच्या कामासाठी आलेले इंग्रजी अधिकारी त्यांच्या हॉटेल मध्ये येत व समाधानी होत. बबनराव यांचा पिंडच धडपड्या नवी अव्हाने पैलण्याचा नव्या वाटा शोधण्याचा या साठी मेहनत व कष्ट करण्याचा सायबाचा कारभार वेगळाच होता. निघालेली बेलगाडी आठनऊ तास होतील तेंव्हा नगरला पोहचत होती करंजीच्या घाटात बैल दमुन जात. आशा वेळी चारचाकी माल वहातुक गाड्या शिकले त्या काळात फिटर हि व्यक्ती दुर्मीळच होती. स्वत: बबनराव स्टेरींग चालवणार्या हातानी स्वत:च्या हातानी स्वत: गाडी खोलुन दुरूस्त करित. ड्रायव्हींग चाक हातात आल्यावर खाचखळग्यांच्या रस्त्यावर ते कंमांड ठेऊन वावरत होते. मालवहातुकी बरोबर प्रवासी गाड्या ही त्यांनी घेतल्या. मुंबई सारख्या शहरात ही त्यांनी आपले ऑफीस सुरू केले. इंग्रज शासनाने त्यांची हुशारी पाहुन त्यांना प्रवास कंपनी सुरू करून दिली. नट बोल्ट ते प्रवाशांचे प्रशासन बबनराव एकटे पहात. ही अफाट बुद्धीमत्ता अफाट स्मरणशक्ती अफाट प्रशासन व कमी शिक्षीत असुनही इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहुन इंग्रज ही अचंबित होत असत. त्यांच्या या प्रभावामुळे काही काळ वहातुक व्यवस्था अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र पुर्व काळात परदेशातही जावे लागले. नवी आव्हने शोधने व ती खंबीरपणे त्यांना सामोरे जाणे ही त्यांची जीवन पद्धती होती. त्यामुळे ते प्रत्येक बदलत्या काळाला यशस्वीपणे सामोरे गेलेत. त्याकळी पार्थर्डीते नगर हीच 2:3 फेर्यांची एस.टी. होती. बाकी राहिलेल्या ग्रामीण भागात भांडकरांची शासनमान्य प्रवासी सेवा होती . या सेवाकाळात ड्रायव्हर नसेल तर स्वत: गाडी चालवणे. दारात उभे राहुन प्रवासांची चढउतार करणे. गाडीत बिघाड झाला तर स्वत: गाडी खाली जावुन दुरूस्ती करणे हे स्वत: पहात या व्यवसायात त्यांनी नगर येथील आपल्या इंगळे नातलगांना ही त्यांनी सामावुन घेतले. पाथर्डीत तेव्हा लाईट नव्हती. त्या वेळच्या गाड्यांनाही लाईट नसे. पण बबनराव रॉकेलचा कंदिल पेटवुन गाडी चालवत हे जेव्हा समजले तेंव्हा हा अजब रसायनाचा माणुस समाज बांधव होत ही बाब अंगावर काटा उभी करणारी होती व आहे सुद्धा. पाथर्डी, नगर, मुुबई पर राज्यात ही आपले जाळे पसरणे ते सुद्धा पाथर्डी सारख्या आज ही आडबाजुच्या गावातुन ही बाब नोंद ठेवावी आशीच आहे. यंत्र व बबनराव हे एक अजब नाते निर्माण झालेले होते. समाजमाता केशरकाकु यांनी महिलांनी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली तेंव्हा मशनरीची निवड करतांना भांडकरांना हाक दिली आगदी पाथर्डी तालुक्यतील पहिला साखर कारखाना जो सुरू झाला त्यावेळी सुद्धा हेच भांडकर उभे होते. नुसती यंत्रे न पहाता ते तेवढेच व्यवहारी होते. त्यांमुळे त्यांनी प्रवासी वहातुक ही एस.टी.च्या वावरानंतर बंद करून भांडकर ट्रान्सपोर्ट सुरू ठेवले. मुंबई येथे चित्रपट क्षेत्रातील अग्रगण्य राजकपुर यांची मैत्री जमवली आर. के. स्टुडीओच्या साठी ते वहातुक करित होते. 1955 च्या दरम्यान शिरूर, नगर व पाथर्डी या ठिकाणीच फक्त चित्रपटगृह होती यातील पाथर्डी येथिल चित्रपटगृह भांडकरांचेच होते. सिनेमा गृह, डिझेल इंजीनवर चालणारी पिठाची गिरण, शासकीय रेशनींग दुकान ही त्यांनी यशस्वी पणे चालविले. काही काळ साखरेचा ठेाक व्यवसाय ही केला. फक्त चौथी शिकलेले बबनराव आजच्या भाषेत सांगावयाचे तर मास्टर ऑफ इंजिनींरींग होते. नट व बोल्ट व अनेक नंबरच्या पान्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते.
समाजसेवा ही वृत्ती होती म्हणुन ते कृतीशील राहिले.
साधारण तहा 1990 पासुन त्यांना मी तेली समाज कार्यात पाहिले आहे. स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा सिंधी लोक भारतात आले. फाळणीच्या दु:खाचे ओझे घेऊन ते भारतात रस्ता मिळेल तिकडे निघाले आपले मिळेल ते साहित्य घेऊन नगरच्या स्टँडवर उतरले. ही कुणकुण लागताच भांडकरांनी विना मोबदला सामानाची वहातुक करून त्यांना जिथे निवारा मिळाला तेथे घेऊन गेले. त्यांना उभे रहाण्यास सहकार्य केले. याची कबुली अनेक वयोवृद्ध सिंधी बांधव देतात. समाज प्रेम हा त्यांचा स्वभाव होता. व्यवसाय मुळे महाराष्ट्र पिंजुन काढताना सुदुंबरे समजले. कै. रावसाहेब पन्हाळे कै. आण्णासाहेब भागवत असताना ते समाज कार्यात सहभाग घेत. एक वर्षे उत्सव अध्यक्ष हे पद आपले वडिल गणपतराव भंडकर यांना मिळाले तेंव्हा त्यांनी उत्सवासाठी सर्वांची सेवा व त्याग ही केला. नगर जिल्हा हा भौगोलिक व नैसर्गिक बाबत असमतोलतेचा परंतु या शहरी व ग्रामिण समाजाचे संघटन व्हावे लहान लहान वाटणार्या समस्या या ग्रामीण भागात फार मोठ्या आसतात. संघटनेद्वारे विविध प्रश्नमिटावेत या विचारातुन कै. टि. आर. दारूणकर, श्री. जगन्नाथ लुटे, बाबुराव साळुंखे, आसाराम शेजुळ, कै. प्रकाश लोखंडे या सारख्या बांधवांना एकत्र घेऊन त्यांनी नगर जिल्हा स्तरावर समाजाची संघटना बांधली कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. समाजात आत्मविश्वास निर्माण केला. सर्वसामान्य होतील असे निधी संकलनाचे मार्ग निवडले समाजाला बरोबर घेऊनत्यांनी वधु-वर मेळावा ही यशस्वी करण्यास आघाडी घेतली. यातुन जे पैसे शिल्लक राहिले होते. त्या पैशांच्या एफडी केल्या त्या एफडीच्या पावत्या स्वत: जवळ न ठेवता संबधीत पदाधीकारी मंडळीकडे ठेवल्या. कै. गणपतराव भांडकर यांनी पाथडी्रच्या मेन बाजार पेठेत भवानी मातेच्या मंदिराची उभारणी समाजाला सोबत घेऊन केली त्या मंदिराच्या विकासासाठी दुकानाचे गाळे निर्माण करून कायम उत्पन्न कै. बबनरावांनी निर्माण केले. सर्व विधी व उत्सव त्यांनी जीवनभर यशस्वी केले. श्री. संत संताजी महाराजांची पुण्यतिथी मिरवणुकी द्वारे शहरभर साजरी करित असत. पाथर्डी स्टँड जुने जे आहे. त्या लगत चार गुंठे जागा एका मारवाडी मित्रा कडुन अल्प पैशात मिळवली आहे हि जागा सुद्धा समाजाच्या ट्रस्टला घेण्यास लावली. भविष्यात इथे विकास झाला पाहिले यासाठी समाजाच्या ट्रस्टचे राहिलेले पैसे बँकेत त्यांनी एफडी करून ठेवलेत. ही त्यागी व निस्वार्थ सेवा आज भावी पिढीला उपयोगी पडत आहे.
पैशाच्या मागे न लागता पैशाचा पाऊस त्यांच्याकडे पडत होता.
पावसाचा ठण ठण पाळ असलेल्या पार्थडी तुलका आजच्या पेक्षा त्याकाळी आतीशय भयाण होता. आशा वेळी पाथर्डींच्या मातीत पाय रोवुन महाराष्ट्र पिंजुन काढत असताना त्यांनी मुंबई, नगर या शहरात अनेक खरदी खते केली. पाथर्डीच्या स्टाँडवरील ही फक्त लांब लचक इमारत नव्हे तर आशा अनेक प्रगतीची केंद्रे निर्माण केली. घरदार सोडून आलेल्या मारवाडी व गुजराथी मंडळींनीच व्यवसायातुन प्रगतीचे टप्पे गाठावेत ही आपली संकल्पना मोडीत काढली होती. त्यामुळे त्यांनी व्यवसाय करून प्रगतीचे शिखर गाठले पण आपला लेंगा शर्ट व टोपी यात कधीच बदल केला नाही. आपली साधी राहणी कधीच सोडली नाही. आपला व्यवहारी पणा विसरले नाहीत. प्रमाणीकपणा, सेवा व त्याग या पासुन दुर गेलेले नाहित.
नातलगांचा आधार न सांगता स्वत:ची ओळख निर्माण केली.
जेंव्हा आरक्षण प्रणाली नव्हती त्या काळात कै. बाबुराव इंगळे हे दोन वेळा नगरचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या उमेदवारीच्या काळात कै. बबनरावांनी सहकार्य ही केले होते. कालांतराने ते राजकारणात गेले व नगराध्यक्ष ही झाले. पुण्यातील रावसाहेब पन्हाळे यांचे व भांडकरांचे अगदी जवळचे संबध. स्वातंत्र्याच्या पहिल्या टप्यात शासन दरबारी पन्हाळे यांचा शब्द मोलाचा होता. जग प्रसिद्ध दामु धोत्रे व कै. अॅड. गोविंदराव पवार त्यांच्याशी त्यांचा नाते संबंध आला. पवार हे वकिल होते. पुणे सममाजाचे अध्यक्ष होते. मराठा समाजाच्या अनेक संस्था उभारणीत आघाडीवर होते. खेड (राजगुरूनगर) येथील कै. सितारामशेठ कहाणे हे तेल उत्पादक होते. आणी पुणे जिल्हा परिषदेचे त्याकाळी सदस्य होते. तसेच त्यांचे अॅॅड. गोविंदराव पवारसह कै. सिताराम शेठ व्याही होते. या ही पेक्षा दुसरी घटना फार मोठी. समाजमाता केशरकाकु यांचे घराणे सन 1947 पासुन राजकारणात आहे. अनेक सत्तेची केंद्र क्षिरसागराकडे आहेत. कै. सोनाजीराव क्षिरसागर व कै. केशारकाकु क्षिरसार यांची कन्या सौ. लतीकाताई ह्या मोठ्या सुनबाई कै. बबनरावांच्या आहेत. या नावावर किंवा त्यांच्या शब्दावर अनेक यशाची शिखरे गाठता आली आसती. पण कै. बबनराव नेहमी म्हणत. भांडकरांची वाटचाल ही भांडकरांच्या धडपडीची आहे. माझे नातलग व्याही किती ही मोठे असले तरी त्यांचा अभिमान जरूर आहे. त्यातच नातलंगाचे व आमचे मोठे पण आहे.
व्यवहारिक पणा हा कै. बबनरावांचा केंद्र बिंदु
4 थी शिकलेले बबनराव रोज टाईम्स ऑफ इंडियाचे वाचन करित असत. धार्मीक होते पण देवभोळे नव्हते. योग्य निर्णय ही त्यांची जमेची बाजु होती. माल वाहातुकीला गाडी घेतली पण त्यांचा पहिला विमा उतरवला पाहिजे. विम्याचे हाप्ते गेले पाहिजेत रोजच्या उलाढालीच्याअचुक नोंदी पाहिजेत. सेल्स टॉक्स इंन्कम टॉक्स साठी लागणार्या नोंद व कागद पत्रे ते स्वत: करित चार्टड अकाँउंट किंवा वकिलाला फक्त शिक्का मारावा लागे. संबंधित अधीकारी अनेक वेळा त्यांचा सल्ला घेऊ पहात. मित्र व्यवसायिक असत त्यांना ते कागदपत्रे कशी ठेवावीत हिशेब कसे सादर करावेत याचे मार्गदर्शन करीत त्यामुळे लाखो रूपयांची बचत अनेकांची होत असे. कारण वकिल व चार्टड अकाउंटंट तेवढी फी घेत असे. शिक्षण कमी होते परंतु व्यवहारातील नोंदी अध्यावत कश्या असाव्यात एवढे पुर्ण ज्ञान आत्मसाथ केले होते. महाराष्ट्र बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पोष्ट ऑफीस आशी अनेक शासकीय ऑफिस पाथर्डी येथे सुरू करण्यास व त्यांना जागा देण्यास भांडकर सर्वा पुढे होते. आज ही पाथर्डी स्टँड समोरच्या त्यांच्या इमारतीत बरीच शासकीय ऑफीसेस आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाची वणवण कमी झाली आहे.
श्री. वसंतराव भांडकर
कै. बबनरावांच्या विचारात उभे राहिलेले हे त्यांचे मोठे चिरंजीव कै. केशरकाकुंचे दोन नंबरचे जावई. परंतु कसलाच रूबाब नाही. कसलाच स्वत: विषयी वेगळे पणा नाही. मी एक तुमचाच तुमच्या सारखा बांधव ही त्यांची ठेवण. समाजाच्या अनेक उपक्रमात सहभागी असतील पण प्रसिद्धी व मोठेे पणा या पासुन चार हात दुर येथे पाहिजे तेथे त्यागास समोर परंतु मोठे पणा पासुन दुर. आज ते ट्रान्सपोर्ट व इतर व्यवसाय यशस्वी पणे संभाळत आहेत. मुले व मुलीउच्चशिक्षित असुन स्व:ताच्या पायावर उभी आहेत. पत्नी सौ. लतीका ताई ह्या पाथर्डी नगरपालिकेच्या 10 वर्ष नगरसेविका होत्या काही काळ नगराध्यक्ष्या ही होत्या. कुटूंबांचे प्रमुख म्हणुन ते भांडकर कुटूंबाचे आधारस्तंभ आहेत. तेली गल्ली मासिकाचे मुळात ते हितचिंतक व आधार स्तंभ आहेत.
श्री. विजयकुमार भांडकर
व्यवसायाची निवड करून कापड व्यवसायात ते स्थिर झालेत. व्यपारी वृत्ती जोपासत असताना त्यांनी वडिलांची समाजसेवा प्रणाली राबवली श्री स्वामी समर्थ नागरी पतसंस्था त्यांनी संस्थापक या नात्याने उभी केली. सम विचारी मित्रांना बरोबर घेऊन अल्प भांडवलात उभी राहिलेली हि पत संस्था पाथर्डी तालुक्यात आग्रगण्य पतसंस्था म्हणुन ओळखली जाते. सत्य, प्रामाणिक पणा, सेवा व त्याग यांचे ज्ञान समर्थ असेल तर देश स्वाभीमानी घडु शकतो ही कै. बबनराव भांडकरांची शिकवण हा देश घडवीण्यासाठी आपण ही खारीचा वाटा उचलु हि श्री. विजय यांची धडपडीतुन श्री. स्वामी समर्थ शिक्षण संस्था त्यांनी उभी केली. या संस्थेत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते. समर्थ भारत बनविण्यासाठी ते विद्यार्थी घडवित असतात.
श्री. प्रमोद भांडकर
कै. गणपतराव भांडकर त्या काळातील प्रसिद्ध पैलवान त्यांनी घरातच तालिम बनवलेली होती. त्या तालमीत उमेदीच्या काळात श्री. वसंतरावांनी मेहनत केलेली. त्याच जोडीला श्री. प्रमोद भांडकर यांनी शालेय जीवनापासुन डाव व प्रतिडाव तालमीत शिकलेत. कॉलेज मध्ये असताना कॉलेजच नव्हे तर नगर जिल्ह्याच्या सिमा ओलाडुन ते पुण विद्यापीठाचे कुस्ती खेळाडु म्हणुन गाजलेले आहेत. अनेक कुस्त्यांचे फड त्यांनी जिंकलेत. आज घरच्या तालमीत ते अनेक पैलवान घडवित असतात. या मुळेच ते पाथर्डी तालुका तालीम संघचे उपाध्यक्ष पद ही त्यांच्या कडे आहे. गोर गरिबांच्या विकासाची गंगा असलेल्या बँकेच्या माध्यमातुन विकास साधन्या साठी ते कर्ज देतात पण कर्जदारावर जप्ती न येऊ देता शंभर टक्के वसुलीसाठी जागरूक रहातात. पाथर्डी नगर पालिकेत ते सलग 10 वर्ष नगर सेवक आहेत. पाणी व बांधकाम समितीचे चेअरमन आहेत. आपण तेली आहोत ही त्यांची रूपरेषा. महाराष्ट्र तेली महासभेचे ते पाथर्डी तालुका अध्यक्ष म्हणुन कार्यरथ होते. समाज संघटने साठी त्यांची रोख ठोक भुमीका ही वादळाची नव्हती समाज विकासाचा एक प्रवाह निर्माण झाला. याच मुळे नुकतीच त्यांची निवड महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा या नविन नोंदणी झालेल्या संस्थेने दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे.
सर्वात असुन सर्वात वेगळे भांडकर
कै. गणपतराव भांडकर यांनी पैलवानकी जोपासत भांडकर नावाला आकार दिला. कै. बबनराव यांनी अल्प शिक्षित असुन ही साता समुद्रा पलिकडे वाटचाल केली गत 25 वर्ष माझे भांडकर कुटूंबाचे स्नेह बंध या प्रदिर्घ काळात एकच ठाम मत सहकार्य घ्या. पण नाव नको मोठे पण ही नको. प्रसिद्धी व मोठे पणा पासुन दुर. सेवा, त्याग, प्रामाणिक पणा या बाबीशी एक निष्ठ. परंतु परवा मी उन्ह डोक्यावर घेऊन गेलो. आणी एक हाट्ट धरला प्रसिद्धी नको मोठे पणा नको ते घऊ नका परंतु तुम्हा भांडकरांचा आदर्श इतर समाज बांधवांना घेऊ द्यात. आणी त्यामुळेच ही मांडणी करू शकलो.
श्री. मोहन देशमाने
प्रसिद्धी प्रमुख श्री संत संताजी म. तेली संस्था सुदूंबरे