श्री. जगन्नाथ चंद्रभान लुटे यांचा जन्म श्रावण शुद्ध पंचमी शके दि. 25/08/1933 रोजी येवला , जि. नाशिक येथे झाला. त्यांचे मुळ गाव वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक हे असून, त्यांचे बालवाडी चे शिक्षण आळंदी येथे झाले. त्यानंतर त्यांनी वावी येथे शेतकरी शाळेमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे चौथीनंतरचे शिक्षण तेली संताजी बोर्डींग नाशिक येथे झाले.
1947 साली वडीलांच्या निधनानंतर वावी येथे त्यांच्या काकांनी त्यांना मुळ किराणा व्यवसायामध्ये उतरवले. त्यानंतर 1949 साली त्यांच्या काकांचे ही निधन झाले. अर्थात त्या नंतर सर्व कुुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. त्या दरम्यान त्यांचा मुळ व्यवसाय असलेल्या किराणा दुकानावर इन्कमटॅक्स व सेलटॉक्सच्या केसेस दाखल झाल्या. त्या कारणावरून त्यांना आपले दुकान बंद करावे लागले.
या सर्व घटनाक्रम घडत असतांना 1951 साली शिर्डी येथील कै. श्री. बाबूराव नारायण कवडे व कै. पुंजाबाई बाबुराव कवडे यांच्या कन्या सौ. चंद्रभागाबाई यांच्याशी ते विवाह बद्ध झाले.
केसच्या घटनाक्रमानंतर ते सन 1954 / 55 च्या दरम्यान शिर्डी येथे व्यवसायानिमित्त आले. सुरूवातीस शिर्डी येथे त्यांनी शिर्डी गावात त्यांच्या मेव्हण्यांचे किराणा दुकान होते. मेव्हणे श्री. नारायणरावांचे 1957 साली निधन झाल्यामुळे त्यांच्याकडील किराणा दुकान व इतर दुसर्याही धंद्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.
सतत घडत असलेल्या आघातातही श्री. दादा हे अविचल व स्थितप्रज्ञासारखे आपल्या आयुष्याची वाटचाल करीत होते. सतत कोसळणार्या संकटरुपी डोंगरांची पर्वा न करता ते आपले पितृतुल्य कै. बाजीराव कोते व परममित्र मुकुंदराव कोते, भानूदास गोंदकर, दत्तात्रय शेळके, सुधाकर शिंदे, अॅड. शिवाजी कोते, पुरूषोत्तम शेळके, सोपान जगताप, बाबुराव साळुंके, बाबूराव गोंदकर आदी मित्रांच्या सहाय्याने सामाजिक , शैक्षणिक आध्यात्मीक, व्यावसायीक कार्यात ते अग्रेसर राहत होते.
मुळचे व्यवसायीक घराण्यात त्यांचा जन्म होऊनही दादांचा पिंड हा आध्यात्मिक आहे. त्यांना मित्रांची, समाजसेवेची मनापासुन आवड आहे. म्हणुनच त्यांना नारायणगिरी, ढोक, रामगिरी अश्या अनेक आध्यात्मिक गुरूंचा सहवास लाभला.
वावी सारख्या एका खेड्यात जन्मला आलेले दादा हे नाशिक जिल्हा सोडून नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे वास्तव्यास संपूर्ण नगर नव्हे राज्यभर प्रसिद्ध झाले. दादांचे नाव हे नगर जिल्ह्यात अग्रक्रमाणे घ्यावे लागेल.
आध्यात्मिक कार्यात दिवस जात राहीले. आपल्या मित्रांच्या सोबतीने त्यांनी 1988 साली शिर्डी सहकारी पतसंस्था मर्यादित सुरू करून आपली सामाजिक जाणीवाच्या कर्तृत्वाची पूर्तता केली व सर्वसामान्यांना वेळोवेळी आर्थिक मदत होईल या रूपाने सामाजिक ऋण म्हणुन सुरू झालेली ह्या संस्थेचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे.
त्यांना सामाजिक, व्यवसाईक, राजकीय गोष्टींची आवड आहे. तशीच त्यांना आध्यत्मिक गोष्टीतही रस आहे. याचाच प्रत्यय म्हणून ते विठ्ठल रूक्मिणी संस्थान चे विश्वस्त म्हणून जे कार्य त्यांनी केले त्याचा उल्लेख येथे आवर्जुन करावा वाटतो. आता त्यांचा या कार्याचा त्यांचे चिरंजीव दत्तात्रय हे सांभाळत आहे. कुटूंबत्सल दादांनी आजही एकत्र कुटूंबपद्त टिकवुन ठेवली आहे. आधुनिकतेच्या काळात ही टिव्हीच्या जमान्यातही विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना दादाच्या संस्कारामुळे लुटे कुटुंबीय आजही एकत्र आहे. कुटुंबपद्धतीचा आदर्श घ्यावा असे उदाहरण आहे. समाजाप्रती असलेली सामाजिक व राजकीय ऋण हवे ही दादांचीं असलेली शिकवणीतुन त्यांच्या लहान स्नुषा ह्या त्यांचा वारसा पुढे चालवत असुन, त्या नगरसेवीका या पदावर कार्य करत आहे.
दरम्यानच्या काळात तीन मुले व तीन मुली असा कौटुंबिक प्रवास करीत असतांना मोठा मुलगा मुंकुंद लुटे यांचे 1979 साली निधन झाले. कर्ता मुलगा गेल्याने दु:खाचा डोंगर त्यांच्या वरती कोसळला.
नियतीने कलेल्या कठोर आघातातुन सावरूनही त्यांनी आपल्या कुटुंबालाही सावरल आपले दु:ख लपवुन ते कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहले. त्यांच्या संसाररूपी रोपट्याचे वृक्ष झाले असून, त्यांच्या संस्कारामध्ये घडलले कै. मुकुंद जगन्नाथ लुटे यांचे चिरंजीव व दादांचे नातू श्री. राहूल मुकुंदराव लुटे हे नाशिक शहरात स्थाईक असून,ते यशस्वीरित्या अॅपे रिक्षा चे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख वितरक आहे व निफाड या शहरात बजाज या अग्रगण्य संस्थेची एजन्सी सांभाळत आहेत. आज त्यांच्या व्यवसायात तयांचे उच्चकोटीचे नाव आहे.
श्री. जगन्नाथ लुटे यांचे द्वितीय चिरंजीव श्री. नारायण उर्फ बाळासाहेब लुटे हे हॉटेल व्यवसाय सांभाळत आहे व त्यांची अर्धागिणी सौ. साधना नारायण लुटे या शिर्डी नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ता आहे. भगवंत कृपेने त्यांच्या संसारवृक्षाच्या वेलीला दोन मुले व एक मुलगी असून, त्यांचे थोरले चिरंजीव श्री. सचिन लुटे हे आजोबांच्या परंपरागत बाबांच्या मंदिराशेजारी असलेल्या (फुलांचा) व्यवसाय व हॉटेल व्यवसाय यशस्वरित्या सांभाळीत असून, त्यांनी या व्यवसायाला प्रगती पाथावर नेऊन ठेवले आहे.
तसेच त्यांचे धाकटे चिरंजीव श्री. संदिप लुटे आपल्या आजोबांचा आदर्श घेऊन नाशिक सह शेर्डी शहरामध्ये आपल्या परंपरागत व्यवसायाचा भार संभाळत असतांनाच सामाजिकतेची जाणीव ठेऊन समाजकारणासह ते राजकारणातही सक्रीय आहेत. ते सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टींचे अहमदनगर जिल्हा कार्यअध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
श्री. जगन्नाथ लुटे यांचे सर्वात धाकटे चिरंजीव श्री. दत्तात्रय लुटे हे हॉटेल व्यवसायासह प्रगतीशील शेतकरी म्हणुन शिर्डी शहराला परिचीत आहेत. व्यवसायासोबत त्यांना अध्यात्माचीही आवड असून ते ह.भ.प.कै. वाघचौरे महाराज यांचे अनुयायी आहे. सध्या शिर्डी शहरामधील विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे विश्वस्त म्हणुनही ते जबाबदारी साभांळत आहेत. त्यांच्याही संसारवृक्षांच्या पालवीला एक मुलगा व तीन मुली आहेत. पैकी विठ्ठलाच्या कृपेने दोन मुली विवाहीत असून धाकटी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. चिरंजीव सागर लुटे हा आपल्या परंपरागत व्यवसायाला पुढे घेऊन जात आहे.
श्री. जगन्नाथ लुटे यांना तीन मुली असून, त्यांपैकी एक नाशीक व दोन नंदूरबार येथे यशस्वीरित्या संसार सांभाळत आहेत.
लुटे कुटुंबीयासोबत शिर्डी शहरातील लोकांच्या पाठीशी नेहमी मार्गदर्शनरूपी उभे राहिलेले श्री. जगन्नाथ लुटे यांना ईश्वर उत्तम आयुष्य आरोग्य देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.