नगरच्या तेली खुंटावर दारूणकर हे एैतिहासीक घराने. तेल उत्पादन करून बाजार पेठेत तेल पेंड विक्री करणे. त्या काळात तेली समाजाच्या तेल उत्पन्नाचे हे केंद्र म्हणुन या परिसराला तेली खुंट हे नाव मिळाले. कै. माधवराव दारूणकर यांचे रामचंद्र व जगन्नाथ हे चिरंजीव. ते घराचा उद्योग करीत होते. रामचंद्र हे धाडसी वृत्तीचे स्वभाव चळवळी त्यामुळे नगर शहरातील स्वातंत्र्य चळवळीत ते ओढले गेले. स्वातंत्र्या साठी प्रभात फेरी काढणे. घरा घरात जावून स्वातंत्र्याचे महत्व पटवुन देणे. यात ते संस्कारक्षम वयात वावरत होते. 1942 मध्ये महामा गांधींनी करेंगे या मरेंगेचा संदेश दिला. भारत छोडो ही गर्जना नगरच्या तेली खुंटावर दिली. तेली खुंट हा नगरच्या मध्यवर्ती परिसर. ही गर्जना नगर शहराल पसरली. अनेक स्वातंत्र्सैनिकांच्या ग्रुप्त बैठका दारूणकर यांच्या येथे होत. रोज सकाळी प्रभात व सायंकाळ सायंफेरी दारूणकर सोबत्यांना बरोबर घेऊन काढत असत. हातात तिरंगा व मुखाने नही रखनी नही रखना यह जालिम सरकार नही रखना हा आवाज उमटु लागला. इंग्रजांचे लक्ष दारूणकरांच्या कडे वळले. त्यांनी साम, दाम, दंड यांचा वापर केला. परंतु आवाज बंद होत नव्हता. उलट तिरंगा घेऊन ते इंग्रजांना सळो की पळो करीत होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना आटक केली. येरवडा जेल मध्ये रवानगी केली. या ठिकाणी एस.एम.जोशी, आच्युतराव पटर्वशन या सारख्य बरोबर शिक्षा भोगताना त्यांना आनंद होत होता. सहा महिण्याची शिक्षा भोगल्या नंतर त्यांनी सावध राहुन गुप्त पणे स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपला संसार पहिला ते नेहमी साधे रहात अडचनीत सापडलेल्या मदत करीत त्याला प्रेमाचा ओलावा देत. नम्रता व निस्वार्थ ही जीवनाची ठेवण ठेवली. महाराष्ट्रशासनाने ताम्रपट व सन्मानपत्र देऊन गौरवले तरी त्यांनी आपली साधी रहाणी व त्यागी वृत्ती सोडली नाही. 1981 मध्ये नगर येथील 100 स्वातंत्र्य सैनिक आलाहबादला गेले होते. या वेळी रामभाऊ मिसाळ यांनी सर्वांचे नेतृत्व केले होते. दारूणकर हे धार्मिक विचारांचे होते. श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्या नंतर दारूणकरांनी भोजन देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या पत्नी कलावती रामचंद्र दारूणकर यांनी परगावातही साहित्य गोळा करून सर्वांना स्वत/ जेवण दिले होते. या प्रसंगाची आठवण श्रीमती कलावती (काकु) आनंदाने सांगतात नगर येथे स्वातंत्र सैनिकांची गृह निर्माण सोसायटी असावी या साठी सर्वांना बरोबर घैऊन नगर गृह निर्माण स्वातंत्र्य सैनिक सोसायटींचे चिफ प्रमोटर म्हणुन यशस्वी पणे काम पाहिले. तेली समाजावर त्यांची निष्टा होती. ते समाज संस्थेचे काही काळ करभारी म्हणुन काम पहात होते. त्यांचा मृत्यु 22/9/1986 रोजी अल्प अजाराने झाला. त्यांच्या नंतर त्यांच्या पत्नी श्रीमती कलावती रामचंद्र दारूणकर आज हयात असुन. पुतणे श्री दिलीप दारूणकर त्यांची स्मृती जागती ठेवण्यासाठी श्री रामचद्र ट्रेडर्स हे होलसेल तेल विक्रीचे दुकान चालु ठेवतात.