नगरमधील अकोला दुर्गम भाग. अकोला मधील राजुर हे अती दुर्गम. या गावात समाज बर्यापैकी भाऊशेठ पाबळकर हे जागृत बांधव.तेलघानी बारा महिने नसे. इतर वेळी दारातील चार जनवरे डोंगरात घेऊन जावे. दुध मिळे. हे कितीतरी पिढ्या चालले. जुलूमी इंग्रजांनी जंगलेच सरकारी ठरवली. गायरानात बंदी आणली. हा कायदा भंग करण्यास क्रांतीसिंह नाना पाटील यांनी गांधींच्या आदेशावर चरणबिळाशी (सांगली) येथे जंगल सत्याग्रह केला. त्याचे पडसाद येथे ही उमटले. राजूरच्या युवकांनी 1930 मध्ये जंगल सत्याबग्रह करून इंग्रजांच्या कार्याचा भंग केला. त्याबद्दल इंग्रजांनी शिक्षाही दिली. परंतु या जुलूमी राजवटीविरुद्ध जागो जागी बुलेटिन वाटणे, वाचून दाखविणे, आदिवासी लोकांना स्वातंत्र्याचे महत्व सांगणे यात हे आघडीवर होते.
1942 मध्ये आझाद मैदानावर महात्मा गांधींनी शेवटचा संदेश करू किंवा मरू दिला मागचा अनुभव जमेस धरून पाबळकर व त्यांचे सोबती जंगलात भुमिगत राहिले. नविन येणार्या भूमिगतांना सहाय्या करणे. इंग्रजांना छुपे हल्ले करून पळता भूई थोडी करणे. भूमिगत सैनिकाम सुसूत्रता रहाण्यासाठी चिठ्ठ्या, निरोप पोहच करणे ही काम करून या देशाच्या यज्ञ कुंडात त्याग केला.