स्वातंत्र्य सैनिक दगडू अंतू क्षिरसागर :- भिंगारची वेश ही एक इंग्रजांचे दडपशहीचे केंद्रबिंदू होते. याचजवळ क्षिरसागरांचे घराणे उगवत्या सुर्याला साक्ष ठेऊन रोज आरेरावीपणा जूलुम व अन्याय पहावा हे ठरलेले होते. जी काही तरूण मन महात्मा गांधीच्या विचाराने जागृत झाली त्यांपैकी प्रमुख हा एक या मातीचा आवाज हेता. आशावेळी भिंगारच्या स्वातंत्र्य सैनिकानी ठरवले. ब्रिटिश राजवटीला हादरा देऊ. त्यातील एक भाग म्हणुन नगरच्या सरोज टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवु आणी ही राजवट खीळ-खीळी करू. या सर्व कामात क्षिरसागर सहभागी होत. 6 महिने जेलमध्ये चक्की पिसत होते. बुलेटिन वाटणे चळवळ उभी करणे ही कामे केलीच. पैकी क्षिरसागर हे एक त्यांनी दारूबंदी व इतर लढे उभे केले. 1932 मध्ये दारू दुकान बंदी करण्यास सत्याग्रह झला. फौजदार अरेरावी करू लागला. त्यावेळी ब्रिटीश फौजदाराला क्षिरसागर यानी मारहाण केली. त्याचा परिणाम 21 दिवस शिक्षा झाली. नहीं रखना नहीं रखना ! ये जालिम सरकार नहीं रखना ! हा एक नारा होता. हा एक मातीचा आवाज होता. करू किंवा मरू हा एक संदेश होता.