सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ रौप्य महोत्सवव देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्या सहकार्याने स्नेह व वधु - वर पालक परिचय मेळावा 8 मे 2016 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 भवानी मंगल कार्यालय तळेबाजार, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला.
मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी श्री. सदानंद तेली (अध्यक्ष देवगड तालुका तेली समाज ) हे होते. प्रमुख अतिथी मा. श्री. जनार्दन गोपाळ जगनाडे (अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे ), श्री. सतिश वैरागी, जनार्दनशेठ तेली (माजी जि. प. उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा), श्री. रूपेश वायगणकर (नगररसेवक - मुंबई) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जिल्हा अध्यक्ष एकनाथ तेली, सचिव प्रशांत वाडेकर, वधुवर मेळावा अध्यक्ष नरहरी तेली उपाध्यक्ष नंदकुमार आरोलकर, खजिनदार संजय कवटकर व सर्व पदाधिकारी समाज बांधव या सोहळ्यास उपस्थित होते.
प्रथमत: तळेबाजार येथुन संताजी महाराजांच्या मुर्तीची सवाद्य मिरवणुक पालखी मधुन कार्यालयात आनण्यात आली. सदर प्रसंगी महिलांनी देखिल कोकणी वेशभुषेत आणि संताजी महाराज नावाची टोपी परिधान करून वाजत - गाजत चाललेल्या या मिरवणुकीत सहभाग नोंदविला.
तद्नंतर कार्यालयात संताजी महाराजंच्या मुर्तीची सामुदायीक आरती करून वधु-वर मेळाव्यास प्रारंभ झाला.
व्यासपिठावरील प्रमुख अतिथी श्री जनार्दन जगनाडे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात वेगळाच आनंद समाज बांधवांच्या चेहर्यावर जानवत होता.
जनार्दन जगनाडे यानी आपल्या ओघवत्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्हा समाजास शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कोकणातिल अल्प का होईना पण विखुरलेला, तेली समाज या उपक्रमातुन एकत्र आला. देशसेवा व समाजसेवा करण्याचा यशस्वी प्रेयत्न तसेच यातुन समाजाची एकी - प्रेम व मन जुळणी झाली. या सर्वांचा आगळा वेगळा आनंद या उपक्रमाच्य माध्यमातुन प्राप्त झाला.
29 पोटजातीचा समाज (फक्त कोकणच नव्हे ) तर सर्वांनी एकी करून रोटी-बेटी व्यवहार झाले तर संपन्न समाज निर्माण होईल तसेच एकीची वज्रमुठ बांधण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातुन समाज बांधवांना करण्यात आले.
मन स्वच्छ ठेवा, गुणवत्तेला प्राधान्य द्या, काळा - गोरा, गरीब - श्रीमंत, लहाण मोठा, ही दरी दुर करा. मनाने व प्रेमाने जवळ या. पुर्वी आपण डोंगरावर पायी जायचो. आता रोपवेचा वापर करतो ! मग पोटजातीचा अडसर कशासाठी ? असे बदल घडले तरच आपण सामाजिक उन्नती प्राप्त करू, याचसाठी समाज एकतेची वज्रमुठ आवश्यक आहे. समाज उन्नतीसाठी याची गरज आहे. असे मनोगत प्रमुख अतिथी जनार्दन जगनाडेे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी 80 % गुण मिळवणार्या गुणवंत विद्यार्थींचा शिष्यवृत्ती देऊन संताजी महाराज संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येईल तरी संस्थेचे फार्म फॉर्म दिनांक 31 जुलै 2016 पर्यंत भरून पाठवावेत. असे अवाहन जनार्दन जगनाडे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी संताजी महाराज संस्थेचे काय्रकारीणी सदस्य, कणकवलीचे शैलेश डिचोलकर यांनी विषेश परिश्रम घेतले.