श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे या संस्थेची स्थापना किमान 100 वर्षापुर्वी झालेली आहे. संस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील गरिब विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मा. कै. रावसाहेब पहाळे, मा. कै. रावसाहेब केदारी यांनी 40 वर्षापुर्वी ही योजना सुरू केली आहे. मा. श्री. बापूसाहेब वैरागी यांनी ही योजना पुढे चालू ठेवली. श्री. वैरागी हे शिक्षण समितीचे 25 वर्षे चिटणीस होते. सध्या मागील 5 वर्षा पासून श्री. बाळासाहेब शेलार हे शिक्षण समितीचे चिटणीस म्हणुन काम पहात आहे.
समाजात अर्थिक दुर्बल (गरिब) विद्यार्थ्यांना 10 वी नंतर शिक्षणा पासून वंचित रहावे लागते. त्यांना समाजाच्या वतीने हातभार लावून पुढील शिक्षणासाठी मदत करणेचे हेतुने सदरची योजना राबविली जाते. कै. भागवत फांऊडेशन सोलापुर, शैनेश्वर फाउंडेशन, मुंबई, यांच्या वतीने इंजिनीअरींग व मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत केली जाते.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेच्या वतीने 10 वी नंतर कोणत्याही शाखेत विद्यार्थी शिकत असल्यास, त्या विद्यार्थ्यांस रूपये 1000/- शिष्यवृत्ती दिली जाते. या बाबत विद्यार्थ्यांने भरून देण्याचा फॉर्म सोबत देण्यात येत आहे. सदरचा फॉर्म भरून आवश्यक त्या कागदपत्रासह सदरचा फॉर्म दिनांक 31/07/2016 पर्यंत खालील पत्यावर पाठविणे आवश्यक आहे.
तसेच सन 2015-16 या शैक्षणीक वर्षात समाजातील 10 व 12 वी मध्ये 80 % पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचेही फार्म सोबत जोडले आहेत. सदरचे फॉर्मही दिनांक 31-07-2016 पर्यंत खालील पत्यावर पाठविण्यात यावेत.
फॉर्म पाठविण्याचा पत्ता :- श्री. बाळासाहेब गेनु शेलार, चिटणीस शिक्षण समिती, मे. अमोलकन्स्ट्रक्शन, पी.एम.टी. चौक, भोसरी, पणे - 411039, मो. नं. 9922501010
श्री. जनार्दन गोपाळशेठ जगनाडे
अध्यक्ष
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे