नांदेड, दिं. 13 :- तेली समाजाच्या युवकांनी पारंपारिक शिक्षणाचा त्याग करून कौशल्य शिक्षणावर भर द्यावा. येणार्या काळात तुम्ही कोणत्या जातीत जन्मला त्यावरून तुमचे भविष्य ठरणार नसून तुमच्यातील बुद्धी कौशल्य लेखणी व मनगटाच्या ताकदीवर तुम्ही उच्च पदस्थ होऊ शकता त्यामुळे ज्ञानावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, असे उद्गार माजी मंत्री तथा अखिल भारतीय तैलीक महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी काढले.
तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याप्रसंगी उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ सूर्यवंशी होते. प्रारंभी तेली समाजाचे थोर संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री क्षीरसागर जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, दशरथ सूर्यंवशी उद्योजक जीएम जाधव मनोहरशेठ सिंनगारे यांच्या हास्ते करण्यात आले.
या मेळाव्यात जेष्ठ पत्रकार भगवान बगूल, नाशिकचे उद्योजक जी.एम.जाधव आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. डी.पी. सावंत यांचीही भाषणे झाली. महापौर शैलजा स्वामी यांनी संताजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी शेषराव अलोने व सौ. अलोने यांच्या हास्ते सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज यांची पाद्यपुजा केली. यावेळी तेली समाजाच्या महिला सरपंचाच्या मातृदिनाचे औचित्य साधन सत्कार करण्यात आला. त्यात पंचायत समिती हदगाव च्या उपसभापती सौ. जयश्री देशमुख, शिराढोणच्या सरपंच सौ. सुनंदा आहणे, लहानच्या सरपंच शोभा रणखांब, सायाळाच्या सरपंच रतनमाला घंटलवाड यांचा समावेश होता. कु. प्रियंका मनाटकर हिने स्वागतगीतम्हटले, दशरथ शेठ सावकार, सूर्यवंशी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मण क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी दशरथ सूर्यवंशी, बालाजी बनसोडे, झोळगे, गणेश सूर्यवंशी, रामदास राऊत, आदींनी प्रयत्न केले.