तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 1)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
काही दिवसा पुर्वी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्या तालुका पातळीवरील मिटींगला योगायोगाने उपस्थीत होतो. एक तरूण उभा राहिला. आपल्या तडफदार भाषणात त्याने जे विचार मांडले ते प्रथम नमुद करतो. कॉलेंडर छापणे, संताजी उत्सव साजरे करणे, कोजागरी पौर्णीमा, महिलांचे हळदी कुकू, जास्ती जास्त वधु-वर मेळावे भरवणे याच साठी संघटना व पदाधीकारी वावरत असतात. यांना समाज परिवर्तनाची दिशाच नाही. ती दिशा घेणार असाल तरच संघटनेला संघटन म्हणता येईल. हे काम करता येतनसेल तर पदाची हौस भागविण्या पेक्षा पदा पासुन लांब रहा. हे खडे बोल त्यांने मांडले. मी ही मागील अंकात या संघटनेचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) समाजाविषयी मते मांडली होती. परंतु गेल्या महिण्याभर जी या संघटने बाबत वादळ आहे. उलट सुलट प्रतिक्रीया उमटत आहेत. त्या माझ्याकडे आल्या पुनावर्ती सहसा होणार नाही याची काळजी घेऊन संघटन की विघटन.