सामाजीक संघटन करावयास उभी राहिलेली ही संघटना किमान देश पातळीवर आज चार ठिकाणी विभागली आहे. हे असे का घडले याचे चिंतन पहिले झाले पाहिजे होते. चार हि दिशाच्या राजकीय मंडळींनी आपली सोय पाहीली आणी काही राज्यात ती भक्कम करून इतर ठिकाणी नावा पुरती आपली संघटना ठेऊन तिला अखील भारतीय हे लेबल सर्व लावतात. मुळात ही सामाजीक संघटना राजकारण्यांच्या हाती गेल्या नंतर समाजाच्या मतांचे गणीत डोक्यात बसले. निवडणकी पुर्वी सामजाचे मेळावे. समाजाची ताकद, सामाज विकासाच्या गप्पा अजंठ्यावर आल्या. यातुन समाज मतावर काही सत्तेत गेले या मंडळीनी सत्तेत समाजाचा विचार केला का याचा आढावा त्यांनी दिला नाही. आम्ही मागीतला नाही. पुन्हा पाच वर्षीनी पुर्वी सारखेच सुरू होत रहावे. समाज माता केशरकाकु यांनी समाज पिंजुन काढला होता. पक्षा पेक्षा समाज मोठा मानुन त्यांनी इतर पक्षातील बांधव विजयी करण्यात आघाडी घेतली. प्रसंगी अंगावरील दागीने ही त्यांनी उमेदवाराला देऊन विजय खेचुन आणला. जरी तैलिक महासभा ही काँग्रेसच्या वळचनीला वावरत असली तरी पक्षा पेक्षा समाज मोठा मानुन अनेक पक्षांचे कार्यकर्ते समाज संघटनेत होते. क्षत्रीय जातीचा प्रभाव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचनीला संघटना असली तरी महाराष्ट्रात ती पक्षा पेक्षा समाजाची होती. हे ही काही बाबतीत सत्य आहे. काँग्रेस किंवा त्यांचे नाते सांगणारे इतर पक्ष यांनी समाजाचा फक्त उपयोग केला. समाजाला डोके वर काढुन दिले नाही हे वास्तव आहे. ते कुणालाच नाकरता येणार नाही. पडद्या मागुन का होईना राजकीय मंडळी आज राजकारणात उपयोग करून घेत असले तरी. स्वातंत्र्याच्या पहिल्या 25 ते 30 वर्षीत तेली समाजाचे किमान प्रत्येक वेळी दहा आमदार व खासदार एका वेळी तर तिन खासदार ही होते. या साठी तैलीकचा वापर झाला नव्हता. राजकारणातला आपला कोठा स्वत:च्या तकदीवर समाजाने मिळवला होता. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (मराठा) काँग्रेस यांच्या जवळ गेलो तेंव्हा आपला वापर झाला हे वास्तव आहे. 2003 ला समाजाचा महामेळावा झाला. ज्यांच्या दावणीला समाज बांधला होता ती मंडळी हाजर होती. याच वेळी डॉ. बाबासाहेबांचे विचार रूजवतो हे सांगणारे दलित नेते श्री. सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काय करावे तर आरक्षणाची तत्वप्रणाली पाया खाली तुडवत त्यांनी मराठा कुणबी हा जी आर काढला. शासन दरबारात असलेली तेेंव्हाची मंडळी तोंड बांधुन गप्प बसली. हा राक्षस जेंव्हा पाय पसरु लागला तेंव्हा काँग्रेस व रा. काँग्रेसने नेतेच गारद केले. नेत्यांच्या पुरती असलेल्या या संघटनेने समाजाचा विचार करून आपल्या पक्षाला जाब विचारला नाही. किंवा भविष्यात विरोधाचे फळ अती कडु असेल हा विचार असावा. यातुन समाज दुरवत चालला. विकासाचे बिगुल घेत मोदी लाट आली. लाटेवर स्वार व्हावे म्हणुन काही समोर आले. मा. नरेंद्र मोदींचे भाऊ काहींच्या संपर्कात होते. त्या पुर्वी त्यांची मिटींग किंवा भेटी गाठी झाल्या असतील कारण त्या शिवाय एका दिवसात या संघटनेची मिटींग नंदुरबार येथे शक्य नाही. आणी भाजपाच्या (ब्राह्मण्याच्या) पायावर समाज ठेवला.